Married To Pakistani Girl: प्रेमात (Love) आणि युद्धात (War) सगळं काही माफ असतं हे आपण अनेकदा ऐकले असेल. हाच विचार करत अनेक तरुण तरुणी प्रेमात सर्वस्व वाहून देतात. मग घरच्यांची संमती नसेल तर पळून जाऊन लग्न करणे वैगरे गोष्टींचा अवलंब ही प्रेमयुगुलं करतात. तर काही मुलं आणि मुली परदेशातील (Aborad) आपल्या वयाच्या मुलाला किंवा मुलीला आपला जीवनसाथी (Lifepartner) म्हणून निवडतात. मग त्यात राहण्यापासून ते खाण्याच्या सवयीपर्यंत सगळे बदल होतात.
असंच मुंबईतील (Mumbai) एका तरुणाचे लग्न देखील सध्या असाच चर्चेचा विषय ठरत आहे. त्याने परदेशातील तरुणीशी नव्हे तर पाकिस्तानातल्या (Pakistan) एका तरुणीशी विवाह केला आहे. त्यामुळे प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं हे अगदी खरं केलं आहे.
वृत्तानुसार, मुंबईत राहत असलेल्या महेंद्र कुमार या तरुणाने पाकिस्तानाचे नागरिकत्व असलेल्या संजुगाता कुमारीसोबत लग्न केले आहे. सोशल मीडियावर या दोघांची ओळख झाली आणि त्यानंतर दोघांनी एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला. त्याने हा निर्णय घेतला आणि तिच्याही विवाह करण्यासाठी तो कुटुंबासोबत थेट पाकिस्तानातील सुक्कुरमध्ये गेला. हा विवाह सोहळा सुक्कुमधील एका हॉलमध्ये पार पडला. या विवाह सोहळ्याला या जोडप्याचे काही नातेवाईक आणि पाकिस्तानातील हिंदू समाजातील लोकं उपस्थित होते. तसेच त्यांनी घेतलेला हा निर्णय चांगला असून त्यांच्या आनंदात सामील असल्याचं दोघांच्याही नातेवाईकांनी सांगितलं.
संजुगाताच्या आईवडिलांनी सांगितले की, 'महेंद्र आणि संजुगाता दोघांची सोशल मिडियावर ओळख झाली. त्यानंतर त्यांची मैत्री वाढली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले'. त्यानंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती तिच्या पालकांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही कुटुंबांनी मुलांच्या आनंदात सहभागी होत या लग्नाला परवानगी दिली. त्यांनी व्हॉट्सअॅपद्वारे एकमेकांशी संपर्क साधला. त्याद्वारे त्यांनी लग्नाबाबतचे निर्णय घेतले.
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर येणार भारतात
दोन्ही देशांतील नियमांचा विचार करता बरीच कायदेशीर प्रक्रिया या दाम्पत्याला पूर्ण करावी लागणार आहे. तसेच दोन्ही देशांच्या सुरक्षिततेचा विचार करता या कायदेशीर बाबी पूर्ण करणं देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन संजुगाता आपल्या पतीसह काही दिवसांतच भारतात परत येतील.