China Spread Covid 19 : कोरोना विषाणूबाबत (Coronavirus) मोठी माहिती समोर आली आहे. चीनने जैविक दहशतवाद (Biological Terrorism) पसरवण्यासाठी कोरोना विषाणू तयार केला, अशी धक्कादायक माहिती वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीतील (Wuhan Institute of Virology) एका संशोधकाने उघड केली आहे. लोकांना हेतुपुरस्सर संक्रमित करण्यासाठी कोविड -19 'जैवशस्त्र' (Bioweapon) तयार केलं, असं वुहानच्या संशोधकानं उघड केलं आहे.
जैविक दहशतवाद पसरवण्यासाठी कोरोनाचा वापर
वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या (Wuhan Institute of Virology) संशोधकाने (Researcher) कोरोना व्हायरसबद्दल धक्कादायक दावे केले आहेत. या संशोधकाने दावा केला आहे की, चीनने जाणूनबुजून 'बायोवेपन' (Bioweapon) म्हणून कोरोना व्हायरस तयार केला होता. या संशोधकाने सांगितलं आहे की, हा विषाणू चीनने 'जैविक अस्त्र' म्हणून तयार केला होता आणि त्याच्या सहकाऱ्यांना विषाणूचे चार प्रकार देण्यात आले होते. यामधील कोणता विषाणू अधिक वेगाने पसरू शकते ते शोधा, असं संशोधकांना सांगण्यात आलं होतं.
सर्वात प्रभावी विषाणू ओळखण्याचं काम
वुहान येथील संशोधकानेच कोरोना विषाणू चीनमधूनच पसरल्याचा दावा केल्यामुळे हा दावा आता अधिक खात्रीलायक मानला जात आहे. या शास्त्रज्ञाने दावा केला आहे की, चीनने जाणूनबुजून कोरोना विषाणूला ‘जैव शस्त्र’ म्हणून तयार केलं होतं. चाओ शान यांनी हा धक्कादायक दावा आंतरराष्ट्रीय प्रेस असोसिएशनच्या सदस्य जेनिफर झेंग यांच्या विशेष मुलाखतीत केला आहे. चाओ यांनी सांगितलं की, त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मानवांसह विविध प्राण्यांमध्ये पसरणारा सर्वात प्रभावी विषाणू ओळखण्याचं काम देण्यात आलं होतं. ही संपूर्ण मुलाखत जेनिफरने तिच्या ब्लॉगवर पोस्ट केली आहे.
चीनने 'बायोवेपन' म्हणून कोरोना तयार केला
जगभरात धुमाकूळ घालणारी कोरोना महामारी (Covid-19 Pandemic) आता कुठे संपण्याच्या मार्गावर दिसत आहे. कोरोनासारखी भयंकर महामारी नेमकी आली कुठू हा प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं काम आजही सुरु आहे. अनेक देशाने कोरोना माहामारीसाठी चीनला कारणीभूत ठरवलं आहे. चीनचे हा विषाणू तयार केला आणि त्यानंतर तो जगभरात पसरला, असा दावा जगभरातील शास्त्रज्ञांनी केला आहे. जगातील अनेक संशोधकांनी या महामारीसाठी चीनकडे बोट दाखवलं आहे. अगदी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना (Covid-19 Origins) चे मूळ शोधण्यासाठी एक टीम चीनला पाठवली. मात्र, चीनने सर्व आरोप फेटाळून लावले. कोरोनाचा प्रसार अमेरिकेतून झाल्याचं अनेक चिनी अधिकाऱ्यांनी म्हटलं. पण आता चिनी संशोधकाच्या दाव्याने पुन्हा एकदा चीनकडे नजरा वळल्या आहेत.