Cryptocurrency : क्रिप्टो   एक्सचेंज (Cryptocurrency) मधून लोक चांगले पैसे मिळवू लागले आहेत. क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणारे बक्कळ पैसा कमवत आहेत तर दुसरीकडे अनेकांवर तोटा झाल्याने कंगाल होण्याचे वेळ आली आहे. परंतु, 2017 मध्ये क्रिप्टोची कंपनी सुरू करणारा आज कोट्याधीश बनला आहे.
 
मॅक्डोनलमध्ये काम करणाऱ्या चांगपेंग झाओ  (Changpeng Zhao) यांनी 2017 मध्ये Binance नावाने एक क्रिप्टो  एक्सचेंज सुरू केली होती. आज ते कोट्याधीश झाले आहेत. चांगपेंग झाओ यांची आजची संपत्ती तब्बल 96 अब्ज डॉलर एवढी आहे. चांगपेंग झाओ यांनी उत्पन्नात भारतातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांनाही मागे सोडले आहे. मुकेश अंबानी यांची 92.9 अब्ज डॉलर एवढी संपत्ती आहे. 


ब्लूमबर्ग बिलिनियर इंडेक्सने नुकतीच जगभरातील श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली आहे. या आदीत भारतातील गौतम अदानी यांचाही समावेश आहे. अदानी यांच्याकडे 78.9 अब्ज डॉलची संपत्ती आहे. गौतम अदानी हे भारतातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर मुकेश अंबानी हे दशात सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. 


चांगपेंग झाओ यांनी कंपनी सुरू केल्यापासून केवळ साडेचार वर्षात एवढी संपत्ती मिळवली आहे. साडे चार वर्षात 96 अब्ज डॉलर एवढी संपत्ती कमावणाऱ्या  झाओ यांच्याकडे Binance या कंपनीचे  90 टक्के  शेअर्स आहेत. चांगपेंग झाओ यांच्या वैयक्तिक क्रिप्टोकरंसी होल्डींगचा त्यांच्या एकूण संपत्तीत समावेश केला तर ते जभातील सर्वात श्रीमंत असलेल्या बिल गेट्स यांच्याही पुढे जाऊ शकतात. बिल गेट्स यांची सध्याची संपत्ती तब्बल 134 अब्ज डॉलर आहे.  


महत्वाच्या बातम्या