Jennifer Nayel Nassar Love Story: अब्जाधीश बिल गेट्स (Bill Gates) यांची मोठी मुलगी जेनिफर गेट्स (Jennifer Gates)  लग्न बेडीत अडकली आहे. जेनिफरने मिस्रचे घोडस्वार नायल नासरशी (Nayel Nassar) लग्न केले आहे. न्यूयॉर्कच्या (New York) वेस्टचेस्टर (Westchester) येथे यांचा लग्नसोहळा पार पडला आहे. जेनिफर आणि नायल यांचे शुक्रवारी लग्न केले. परंतु, या लग्नाची माहिती गुपीत ठेवण्यात आली होते.  हा विवाह सोहळा नॉर्थ यॉर्कमधील नॉर्थ सालेममध्ये 142 एकरच्या मालमत्तेच्या बागेत आयोजित करण्यात आला होता. बिल गेट्सच्या मुलीच्या लग्नात सुमारे 300 पाहुणे उपस्थित होते. या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 


मीडिया रिपोर्टनुसार, जेनिफर आणि नायल हे 2017 सालापासून एकमेकांना डेट करत होते. दोघांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पदवी पूर्ण केली. दरम्यान, या दोघांनी 2020 साली त्यांच्या साखरपुड्याची घोषणा केली होती. विशेष म्हणजे, जेनिफर ख्रिश्चन धर्माचा आहे. तर, नायल हा मुस्मिल आहे.


हे देखील वाचा- यूएस कॅपिटॉल हल्ल्यासंबंधी कागदपत्रे प्रकाशित करु नयेत; डोनाल्ड ट्रम्प यांची न्यायालयात याचिका


इंस्टाग्राम पोस्ट-



तिच्या लग्नाच्या खास दिवशी जेनिफरने कस्टम वेरा फुल स्लीव्ह वेरा वांग गाऊन परिधान केला होता. जेनिफरच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी तिला नऊ वधू -वरांनी मिळून तयार केले होते. तर या लग्नात नयालने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि बॉटी असलेला काळा टक्सिडो परिधान केल्याचे वरील फोटोमध्ये दिसत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रिसेप्शनासाठी फक्त नातेवाईकांना आणि मित्रांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी अब्जाधीश मायकेल ब्लूमबर्गची मुलगी जॉर्जिना ब्लूमबर्ग देखील या रिसेप्शनमध्ये दिसली. जेनिसर आणि नायल यांच्या विवाहाची अनेकांना उत्सुकता होती. मात्र, फारच सिक्रेट ठेवून विवाह सोहळा पार पडल्याने अनेकजण निराश झाले आहेत. 


जेनिफर आणि नायल यांच्या विवाह सोहळ्याची संपूर्ण जबाबदारी वेडिंग प्लॅनर मार्सी बाल्मच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती. या विवाह सोहळ्यात अंदाजे दोन दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजे सुमारे 15 कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे, बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांनी लग्नाच्या 27 वर्षानंतर या वर्षी ऑगस्टमध्ये घटस्फोट घेतला होता. परंतु, जेनिफरच्या विवाहदरम्यान दोघेही पाहुण्यांचे स्वागत करताना दिसले आहेत.