Trending News : सोशल मीडियावर आजकाल जंगली प्राण्याच्या शिकारीचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालेले पाहायला मिळतात. अनेक वेळा जंगली प्राणी मानवी वस्तीत शिरल्याचं पाहायला मिळतं. यामध्ये बिबट्या मानवी वस्तीत शिरण्याचं प्रमाण अधिक दिसून येत आहे. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील थरार पाहून तुम्हालाही घाम फुटेल.


व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका बिबट्याने बचाव पथकावरच हल्ला केल्याचं दिसत आहे. व्हिडीओमध्ये पोलिसांच्यया गाडीच्या मागे एक बिबट्या दिसत आहे. यावेळी बचाव पथकाकडून बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न सुरु आहे. हा प्रयत्न फारच घातक आहे. या बचाव कार्यादरम्यान बिबट्याने दोन लोकांवर हल्ला केला. यामध्ये दोघेही जखमी झाले आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला बिबट्याच्या हल्ला किती प्राणघातक होता याचा अंदाज येईल.







हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी शशांक कुमार सावन यांनी ट्विटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शन देत लिहिलं आहे की, 'पोलीस आणि वन विभागाच्या पथकासाठी हा खूप कठीण दिवस होता. यावेळी दोन कर्मचारी जखमीही झाले आहेत. बचाव पथकाच्या धैर्याला सलाम. बिबट्यासह सर्वजण आता सुरक्षित आहेत.


सध्या वनविभागाच्या पथकाने बिबट्याला सुखरूप पकडून त्याची सुटका केल्याचं व्हिडीओच्या कॅप्शनवरून लक्षात येत आहे. यावेळी कोणाचंही फारसं नुकसान झालेलं नाही. दरम्यान बचाव कार्यावेळीचा या थराराचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओला एक लाखाहून अधिक लोकांनी बघितला आहे. नेटकरी कमेंट करत बिबट्याला वाचवणाऱ्या वनविभाग आणि पोलीस पथकाच्या धाडसाचं कौतुक करत आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :