Bangladesh :  बांग्लादेशमध्ये (Bangladesh) एका फेरीला आज (24 डिसेंबर) भीषण आग लागली. या आगीत 30 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.  200 पेक्षा अधीक लोक जखमी झाले आहेत. बांग्लादेशची राजधानी ढाकापासून 250 किलोमीटरवर असलेल्या झलोकाटी जिल्ह्यात घडली आहे. सुगंधा नदीवरून ही फेरी जात होती. त्यानंतर अचानक या फेरीच्या इंजिनला आग लागली. फेरीला आग लागल्याने काही लोकांनी जीव वाचवण्यासाठी सुगंधा नदीमध्ये उड्या मारल्या परंतू त्यांचा देखील मृत्यू झाला. घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे.  ‘एमवी अभिजान-10’ असं या फेरीचे नाव आहे. झलोकाटी जिल्ह्याचे अतिरिक्त उपायुक्त मोहम्मद नजमुल आलम यांनी सांगितले की, सुमारे 1,000 लोक फेरीमधून प्रवास करत होते. 







अग्निशमन सेवेचे वरिष्ठ अधिकारी कलाम हुसैन भुईया यांनी सांगितले की, "आम्ही आतापर्यंत काही मृतदेह फेरीमधून बाहेर काढले आहेत." लाँचच्या इंजिन रूमला आग लागली  होती, फेरीमधील लोक राजधानी ढाका येथून बरगुना येथे जात होते, अशी माहिती  भुईया यांनी दिली. 


इतर महत्वाच्या बातम्या


Baba Vanga : 2022मध्ये घडणार जगाला हादरवणाऱ्या गोष्टी, बाबा वंगा यांची धक्कादायक भविष्यवाणी


भारतातील कोरोना स्थिती भयावह, लॉकडाऊन लावणं गरजेचं : अमेरिकेचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अॅन्थनी फाऊची


कोविड लसीचा तिसरा डोस घेणं गरजेचं, व्हाईट हाऊसचे मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. अँथनी फाऊची यांचं मत


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha