बांग्लादेश : बांग्लादेशमधील एका कारखान्यास भीषण आग लागून घडलेल्या दुर्घटनेत 52 लोकांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत 50 जण गंभीर जखमी झाले आहे.
बांग्लादेशच्या राजधानी ढाकामधील बाहेरील क्षेत्रामध्ये एका कारखान्याला आग लागल्याने 52 लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यामध्ये 50 जण गंभीर जखमी झाले आहे. शुक्रवारी दुपारी ही माहिती समोर आली आहे. नारायणगंजच्या रूपगंज येथील एका ज्यूस कारखान्यात गुरुवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास आग लागली आहे. इमारतीमध्ये असणारे रसायन आणि प्लास्टिकच्या बाटल्यांमुळे आग वेगानी पसरली आहे.
'ढाका ट्रिब्यून' ने दिलेल्या माहितीनुसार 52 लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यामध्ये 50 जण गंभीर जखमी झाले. आगीपासून जीव वाचवण्यासाठी अनेक कामगारांनी इमारतीच्या वरच्या मजल्यावरून उड्या देखील उड्या मारल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार हाशेम फुडस लिमिटेड कारखान्यात लागलेली आग विझवण्यासाठी 18 अग्निशमन गाड्याच्या घटनस्थळी पोहचल्या आहेत. आग लागल्याची घटना समजल्यानंतर कामगारांच्या नातेवाईकांनी कारखान्यासमोर गर्दी केली. काही कामगार अद्याप बेपत्ता आहे. बेपत्ता कामगारांपैकी 44 कामगारांची ओळख पटली आहे.
वाचलेल्या कामगारांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की, कारखान्याला आग लागली त्यावेळी दरवाजा बंद होता. तसेच कंपनीने आगीपासून वाचवण्यासाठी कोणत्याही संरक्षणात्मक उपाययोजना केल्या नव्हत्या.आगीमुळे कारखान्यात मोठ्या प्रमाणवर धूर पसरल्याने, अनेकांना श्वास घेण्यासही त्रास झाल्याचे समोर आले आहे.
नारायणगंज जिल्ह्यातील अग्निशमन दलाचे अधिकारी अब्दुल्ला अल अरेफिन यांनी सांगितले की, आगीवर संपूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी थोडा वेळ लागेल. 'जोपर्यंत आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले जात नाही तोपर्यंत आगीत किती नुकसान झाले आणि आगीचे कारण याची माहिती देता येणार नाही'.सध्या बचावकार्य सुरू आहे. मात्र आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.