वॉशिंग्टन डी सी : भारतीय वंशाची अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि अंतराळवीर बच विलमोअर यांच्या अंतराळयानात तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे हे दोन्ही अंतराळवीर फेब्रुवारी 2025 पर्यंत अंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावरच (इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरच) अडकण्याची शक्यता आहे.


सुनिता विल्यम्सच्या अंतराळयानात तांत्रिक बिघाड


विल्यम्स आणि विलमोअर यांच्या अंतराळयानाचे नाव बोईंग स्टारलाईनर असे आहे. याच अंतराळयानात तांत्रिक बिघाड झाला आहे. विशेष म्हणजे बोईंग स्टारलाईनरचे हे पहिलेच उड्डाण होते. तांत्रित बिघाडामुळे विल्यम्स आणि विलमोअर यांना परतण्यासाठी हे अंतराळयान सुरक्षित आहे काही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 


अंतराळयानात नेमका बिघाड काय?


मिळालेल्या माहितीनुसार सुनिता आणि विलमोअर यांनी अंतराळात प्रवास चालू केला होता तेव्हाच बोईंग स्टारलाईनरमधील हेलियम या वायूची गळती चालू झाली होती. यासह या अंतराळायानातील 28 थ्रस्टर्सपेकी पाच थ्रस्टर्स हे निकामी झाले आहेत. विल्यम्स आमि विलमोअर हे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात सुखरुप उतरले आहेत. मात्र आता अंतराळयानात बिघाड झाल्यामुळे त्यांचे पृथ्वीवर परतणे आगामी काही महिने लांबू शकते, असे म्हटले जात आहे.  


नासाने नेमकं काय सांगितलं?


आम्ही ही मोहीम चालू केली तेव्ही ती एक टेस्ट मिशन होती. या यानाचे हे पहिलेच उड्डाण होते. त्यामुळे अंतराळातून प्रवास करण्याच्या अनुभवी अंतराळयानाच्या तुलनेत या अंतराळयानातून प्रवास करणे अधिक जोखमीचे ठरू शकते याची आम्हाला कल्पना होती, असे नासाचे अधिकारी केन बोवेरसॉक्स यांनी 7 ऑगस्ट रोजीच्या पत्रकार परिषदेत सांगितले. विल्यम्स आमि विलमोअर यांना परतीच्या प्रवासासाठी बोईंग स्टारलाईनर हे अंतराळयान वापरायला द्यावे की नाही, याबाबत नासाच्या शास्त्रज्ञांची वेगवेगळी मते आहेत. पृथ्वीवर परतताना हेलियम वायू गळती तसचेच थ्रस्टर्स निकामी झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या धोक्याबाबत या संशोधकांत एकमत नाही. 


सुनिता आणि विलमोअर कायमस्वरुपी स्पेस स्टेशनवरच राहणार?


अंतराळयानात बिघाड झाल्यामुळे सुनिता विल्यम्स आणि विलमोअर हे अवकाशातच अडकणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. अंतराळयानातील तांत्रित बिघाडामुळे या दोन्ही अंतराळवीरांचा आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातील मुक्काम काही दिवस वाढणार आहे. ते कायस्वरुपी अवकाश स्थानकात राहणार नाहीत. बोईंग स्टारलायनर या अंतराळयानातून परतणे धोकादायक असल्याचे वाटल्यास या अंतराळयानाचे सॉफ्टवेअर अपडेट केले जाईल. या अंतराळयानाला पृथ्वीवर परतण्यासाठी ऑटोनॉमस मोडवर टाकले जाईल. त्यानंतर स्पेसएक्स या कंपनीच्या क्रू ड्रॅगन या अंतराळयानाच्या मदतीने सुनिता विल्यम्स आणि विलमोअर हे पृथ्वीवर परततील. क्रू ड्रॅगन हे अंतराळयान सध्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर आहे.


13 जून रोजी परतणार होते 


दरम्यान, सुनिता विल्यम्स आणि विलमोअर यांनी  5 जून रोजी स्टारलाईनर या अंतराळयानातून उड्डाण घेतले होते. ते 13 जून रोजी पृथ्वीवर परतणार होते. पण या अंतराळयानात तांत्रिक बिघाड झाल्याने ते सध्या आंतरराष्ट्रीय स्पेस स्थानकात अडकलेले आहेत.  


हेही वाचा :


Moon Mission : चीनने भारत आणि अमेरिकेला टाकलं मागे, चंद्राच्या मातीचे नमुने घेऊन पृथ्वीकडे निघालं अंतराळयान