Nepal : 14 एप्रिल रोजी म्हणजेच उद्या भारतासह जगभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 131 व्या जयंतीपूर्वी, नेपाळचे राष्ट्रपती राम बरन यादव (Ram Baran Yadav) यांनी मंगळवारी सामाजिक न्याय आणि समावेशनासाठी बाबासाहेबांच्या योगदानाचे आणि त्यांच्या अभूतपूर्व कामगिरीचे स्मरण केले आहे. नेपाळ सरकारचे निवेदन वाचून डॉ. यादव यांनी भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करताना बाबासहेबांचे उल्लेखनीय नेतृत्व आणि दूरदृष्टीचे स्मरण केले आहे. दरम्यान, माजी सभापती डॉ.ढुंगाना यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानवाद आणि कायद्याचे राज्य या संदेशाची समकालीन काळात नेपाळसह संपूर्ण दक्षिण आशियातील प्रासंगितकतेवर प्रकाश टाकला. 


बीपी कोईराला इंडिया-नेपाळ फाऊंडेशन काठमांडू विद्यापीठाच्या सहकार्याने बाबासाहेबांची 131 वी आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. नेपाळचे पहिले राष्ट्रपती डॉ.राम बरन यादव यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सभापती दमननाथ ढुंगाना, काठमांडू विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. भोला थापा, नेपाळचे भारतातील माजी राजदूत प्रा. लोकराज बराल, नवीन कुमार यांच्या उपस्थितीत झाले.


या कार्यक्रमात डॉ. यम बहादूर किसन, कमला हेमचुरी आणि हरी शर्मा या विद्वानांची भाषणे झाली. काठमांडू युनिव्हर्सिटी नेपाळ सेंटर फॉर कंटेम्पररी स्टडीज देखील यावेळी लॉन्च करण्यात आले. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आणि एक प्रमुख भारतीय सण आणि उत्सव आहे. हा सण दरवर्षी 14 एप्रिल रोजी भारतासह जगभरात साजरा केला जातो. हा सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांत या दिवशी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आंबेडकरवादी लोक या दिनाला 'समता दिन' म्हणून तर महाराष्ट्र शासन ज्ञान दिन म्हणून साजरा करते.


महत्वाच्या बातम्या :