वॉशिंग्टन : गेल्या 14 महिन्यात तिसऱ्यांदा अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बदलला आहे. यावेळी त्यांनी 'भारतविरोधी' जॉन बोल्टनची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती केली आहे.
बोल्टन याने संयुक्त राष्ट्रातील सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वाला कडाडून विरोध केला होता. संयुक्त राष्ट्र संघात भारताला सदस्यत्व मिळू नये, यासाठी जॉन बोल्टनने चीनशीही हात मिळवणी केली होती.
जॉनच्या नियुक्तीवर स्वीडनचे माजी पंतप्रधान कार्ल बिल्ड यांनी आक्षेप नोंदवला आहे. जॉनच्या अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्तीने संपूर्ण जगात चुकीचा संदेश जात असल्याचं मत बिल्ड यांनी नोंदवलं आहे.
बिल्ड म्हणाले की, “बोल्टनची नियुक्ती ही अतिशय चिंताजनक आहे. त्याच्याऐवजी अमेरिकेत इतरही अनेक व्यक्ती आहेत. जे हे पद चांगल्या प्रकारे सांभाळू शकतात. पण ट्रम्प यांचा हा निर्णय देशासाठी धोक्याची घंटा असू शकतो.”
दरम्यान, वॉशिंग्टन पोस्टने काही दिवसांपूर्वी आपल्या एका वृत्तातून ट्रम्प विद्यमान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एचआर मॅकमास्टरला पदावरुन दूर करण्याचे संकेत दिले होते. मॅकमास्टर आणि ट्रम्प यांच्यात एकवाक्यता होत नसल्याने, मॅकमास्टरची गच्छंती होऊ शकते, असं या वृत्तात म्हटलं होतं.
‘भारतविरोधी’ जॉन बोल्टनची अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Mar 2018 08:15 AM (IST)
गेल्या 14 महिन्यात तिसऱ्यांदा अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बदलला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -