सैबेरिया (रशिया) : रशियातील सैबेरिया शहरातल्या कॅमरोव्हो भागात एका मॉलला रविवारी भीषण आग लागून ३७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर १०० जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
'विंटर चेरी' नावाच्या मॉलमधील चौथ्या मजल्याला आग लागली होती. काही वेळातच आग मोठ्या प्रमाणात पसरली. या मॉलमध्ये सिनेमा थिएटर, रेस्टॉरंट, एक छोटे प्राणी संग्रहालय आणि अनेक दुकाने होती. या आगीत जवळपास प्राणीसंग्रहालयातील दोनशे प्राणी मेल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, अद्याप आगीचे नेमके कारण कळू शकलेले नाही. तेथील स्थानिक टेलिव्हिजन वाहिन्यांवर दाखवल्या जात असलेल्या आगीच्या दृश्यांमध्ये लोक धुरातून वाट काढत मॉलच्या खिडक्यांमधून उड्या मारतानाही दिसले. आत अडकलेल्या लोकांमध्ये लहान मुले मोठ्या संख्येने आहेत.