Elon Musk Tweet : ट्विटरचे (Twitter Deal) मालक बनताच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk)यांनी ट्विट केले की पक्षी मुक्त झाला (the bird is freed) आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटरची सूत्रे हाती घेतल्यानंतर कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल (CEO Parag Agrawal) यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर ट्विटरकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.
मोठे बदल करणार असल्याचे मस्ककडून संकेत
एकेकाळी ट्विटर डीलमधून सुटका करण्याचा प्रयत्न करणारे एलोन मस्क आता उघडपणे ट्विटरवर आपले हक्क बजावताना दिसत आहेत. काल ट्विटरच्या कार्यालयात पाऊल टाकलेल्या मस्कने आपण मोठे बदल करणार असल्याचे संकेत दिले. यानंतर आता ट्विटरवरून राजीनाम्याचे सत्र सुरू झाले आहे. टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर आता ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल आणि सीएफओ नेड सेगल यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त समोर येत आहे. यासोबतच मस्कने ट्विटरच्या कायदेशीर धोरण प्रमुखांनाही बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
एलॉन मस्कने ट्विटर हँडलचे बायो बदलले
मस्कने त्याच्या ट्विटर हँडलचा बायोही बदलला आहे. बायोमध्ये त्यांनी 'चीफ ट्विट' लिहिले. मस्क यांनी ट्विटरच्या मुख्यालयात प्रवेश केला. व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिले, ''Entering Twitter HQ – let that sink in!
मस्क म्हणाले, ट्विटरवर करा चर्चा
मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आम्ही या प्लॅटफॉर्मवर देखील व्यवहार केला आहे. जेणेकरून येणाऱ्या पिढीला एक सामान्य डिजिटल स्पेस मिळू शकेल. इथे अनेक विचारसरणीचे लोक कोणत्याही प्रकारची हिंसा न करता चर्चा करू शकतात. एलॉन मस्क यांनी भीती व्यक्त केली की, पुढे जाऊन इंटरनेट मीडिया प्लॅटफॉर्म राईट आणि लेफ्ट विंगच्या समर्थकांमध्ये विभागले जातील. यामुळे द्वेष पसरेल.
ट्विटर डीलचे प्रकरण काय आहे?
14 एप्रिल रोजी एलॉन मस्कने ट्विटरला $43 अब्जमध्ये विकत घेण्याची ऑफर दिली. मस्कने सांगितले होते की, मी ट्विटरमध्ये गुंतवणूक सुरू करण्याच्या आदल्या दिवशी 100 टक्के भागीदारी $54.20 प्रति शेअर या किमतीच्या 54 टक्के प्रीमियमने खरेदी करण्याची ऑफर देत आहे. ही ऑफर माझी सर्वोत्कृष्ट आणि शेवटची ऑफर आहे आणि ती स्वीकारली गेली नाही तर, मला शेअरहोल्डर म्हणून माझ्या स्थितीचा पुनर्विचार करावा लागेल.