मुंबई : एलियन (Aliens) म्हणजेच परग्रही जीवांबद्दल अनेक दावे-प्रतिदावे केले जातात. तुम्ही बॉलिवूडचा 'क्रिश 3' चित्रपट (Krish 3 Movie) पाहिला असेल, ज्यामध्ये एलियन्स माणसाचं रुप घेऊन पृथ्वीवर माणसांमध्येच राहतात असं दाखवण्यात आलं आहे, पण हे खरं झालं तर, असा तुम्ही कधी विचार केला आहे का? गेल्या अनेक वर्षांपासून एलियन्सबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जातात. आता एलियन्सबद्दलच्या आणखी एका दाव्याने खळबळ माजली आहे. मानवी रुपात पृथ्वीवर एलियन्सचं वास्तव्य असल्याचा दावा करण्यात येत आहे.
एलियन्स पृथ्वीवर राहतायत, तेही मानवाच्या रूपात
अनेक वर्षांपासून एलियन्स पृथ्वीवर मानवी रुप घेऊत राहत असल्याचा दावा हार्वर्ड विद्यापिठातील अभ्यासात केला गेला आहे. त्यांनी काही पुरावे देण्याचाही प्रयत्न केला आहे. हार्वर्ड विद्यापिठातील एका अभ्यासात म्हटलं आहे की, एलियन्स या पृथ्वीवर मानवांमध्ये छुप्या पद्धतीने वास्तव्य करत आहेत. हार्वर्ड विद्यापिठाच्या या अभ्यासात कथित 'क्रिप्टो टेरेस्ट्रियल्स' (Crypto Terrestrials) म्हणजेच मानवांच्या वेषात आपल्यामध्ये राहू शकणारे प्राणी या संकल्पनेवर अभ्यास करत ही तपासण्यात आली आहे.
पृथ्वीवर एलियनचं वास्तव्य
एलियन्सच्या अस्तित्वाबाबत हार्वर्ड विद्यापीठाने केलेल्या अभ्यासात आणखी एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे. हार्वर्ड विद्यापीठाने केलेल्या अभ्यासात दावा करण्यात आला आहे की, एलियन्स पृथ्वीवर मानवांमध्ये छुप्या पद्धतीने वास्तव्य करत आहेत. हार्वर्ड विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे. या संशोधकांच्या दाव्यानुसार, एलियन्स आपल्यामध्ये आहेत. कदाचित ते जमिनीखाली किंवा चंद्रावर राहतात.
एलियन्स मानवी रुपात अनेक वर्षांपासून पृथ्वीवर राहतायत
पृथ्वीवरील एलियनच्या अस्तित्वाची पुष्टी करणारे पुरावे आणि सिद्धांतांचा अभ्यास यामध्ये पुरावे म्हणून देण्यात आला आहे. या अभ्यासात कथित 'क्रिप्टो टेरेस्ट्रियल्स' म्हणजे मानवांच्या रुपात आपल्यामध्ये राहू शकणारे प्राणी ही संकल्पना तपासण्यात आली. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या ह्युमन फ्लोरिशिंग प्रोग्रामच्या संशोधकांचा एलियंन्स संदर्भातील एक नवीन अभ्यास समोर आला आहे.
हार्वर्ड विद्यापिठाचा अभ्यास
या अभ्यासात उडत्या तबकड्या म्हणजेच UFO आणि एलियन्सचा उल्लेख करण्यात आला आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या ह्युमन फ्लोरिशिंग प्रोग्राम अभ्यासात असंही म्हटलं आहे की, यूएफओ हे अवकाशयान असू शकतात, ते पृथ्वीवर राहणाऱ्या त्यांच्या काही परग्रही म्हणजेच एलियंन्सना मित्रांना भेटायला येतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :