Airplane Facts : आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना घडत असतात, ज्या आपण अतिशय सामान्य मानतो आणि त्यामागचं कारण शोधण्याचा प्रयत्नही करत नाही. पण, या सामान्य दिसणाऱ्या गोष्टींमागे भुवया उंचावणारं कारण असू शकतं. यातील एका गोष्टीबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अनेकदा आकाशाकडे पाहिल्यानंतर तुम्ही विमान (Aeroplane) उडताना दिसतं. यावेळी तुम्हाला विमानाच्या मागे आकाशात एक पांढऱ्या रंगाची रेष (White Line) पाहिली असेल. लहानणापासून आपण विमानाच्या मागे दिसणारी ही रेष धूर (Smoke) समजतं आलो आहे, पण हा मोठा गैरसमज आहे.


विमानाच्या मागे दिसणारी पांढऱ्या रंगाची रेष धूर नाही, 


आकाशात विमानाच्या मागे दिसणारी पांढरी रेष ही धूर असल्याचा तुमच्या आमच्या अनेकांचा समज आहे. तुम्हालाही असेच वाटत असेल, तर हा तुमचा गैरसमज आहे. अमेरिकन अंतराळ संस्था (American Space Agency) नासा (NASA) च्या रिपोर्टनुसार, विमानाच्या मागे दिसणारी पांढऱ्या रंगाच्या रेषांना कंट्रेल्स (Contrails) म्हणतात. कंट्रेल्स म्हणजे एक प्रकारचे ढग असतात. पण कंट्रेल्स सामान्य ढगांपेक्षा वेगळे असतात. हे ढग फक्त विमान किंवा रॉकेटमुळेच तयार होतात.


विमानाच्या धुरासारखी दिसणारे ढग म्हणजे काय?


नासाच्या अहवालानुसार, जेव्हा विमान पृथ्वीपासून 8 किलोमीटर अंतरावर आणि -40 डिग्री सेल्सिअस तापमानात उडत असते, तेव्हाच हे ढग तयार होतात, ज्यांना कंट्रेल्स असं म्हटलं जातं. रॉकेट किंवा विमानांच्या एग्जॉस्टमधून एरोसॉल्स बाहेर पडतात. एरोसॉल्स (Aerosol) म्हणजे हवेतील द्रव बिंदू आणि इतर वायूचे सूक्ष्म कण. हवामानातील आर्द्रतेमुळे या एरोसॉल्सचे रुपांतर ढगात होते, यालाच कंट्रेल्स (Contrails) म्हटलं जातं.


हे ढग लगेच गायब का होतात?


विमान (Aeroplane) किंवा रॉकेट (Rocket) काही अंतरापर्यंत गेल्यावर हे कंट्रेल्स गायब होतात, हे तुमच्या निदर्शनास आलं असेल. यामागचं कारण म्हणजे हवेमधील आर्द्रतेमुळे हे कंट्रेल्स तयार होतात. आकाशातील जोरदार वाऱ्यामुळे कंट्रेल्सही त्यांच्या जागेवरून सरकतात आणि गायब होतात. सर्वात पहिल्यांदा कंट्रेल्स 1920 साली दुसऱ्या विश्व युद्धाच्या वेळी दिसले होते. या कंट्रेल्समुळे फायटर पायलट म्हणजे लढाऊ वैमानिकांची सुटका व्हायची. या कंट्रेल्समुळे अनेक विमाने एकमेकांवर आदळल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या, कारण विमानाच्या पायलटला काहीच दिसत नव्हते.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IND Written Number : वाहनांच्या नंबर प्लेटच्या कोपऱ्यावर IND का लिहिलेलं असतं? यामागचं कारण माहितीय?