नवी दिल्ली : भारतीय वंशाचे अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना यावर्षीचं अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक जाहीर झालं आहे. अभिजीत बॅनर्जी यांना गरिबी निर्मूलनाच्या संशोधनासाठी नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. अभिजीत बॅनर्जी यांच्यासोबत एस्थर डुफलो आणि मायकल क्रेमर यांनाही नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
अभिजीत बॅनर्जी यांचा जन्म पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे झाला आहे. विविध वादांमुळे चर्चेत असलेल्या जेएनयू विद्यापीठात त्यांनी एमए अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं. जगभरातल्या गरीबी निर्मुलनासाठी काम करणे आणि प्रयोगात्मक दृष्टीकोण यासाठी अभिजीन बॅनर्जी यांच्यासह तिघांना हे नोबेल पारितोषिक देण्यात आलं आहे.
अभिजीत बॅनर्जी सध्या मॅसाटुसेट्स इन्स्टिट्युट ऑप टेक्नोलॉजीमध्ये अर्थशास्त्राचे फोर्ड फाऊंडेशन इंटरनॅशनल प्रोफेसर आहेत. याशिवाय ते अब्दुल लतीफ जमील पॉवर्टी अॅक्शन लॅबचे सहसंस्थापक असून ते इनोव्हेशन फॉर पॉवर्टी अॅक्शनेच्या संशोधनाचे सहकारी आहेत. याशिवाय ते कंसोर्टियम ऑन फायनान्शियल सिस्टम्स अॅन्ड पॉवर्टीचेही सदस्य आहेत.
नोबेल पुरस्कार मिळालेल्या एस्थर डुफलो या अभिजीन बॅनर्जी यांच्या पत्नी आहे. अभिजीत यांच्या संशोधनामुळे जवळपास 50 लाख मुलं गरीबी रेषेच्या बाहेर आले आहेत.
कोण आहेत अभिजीत बॅनर्जी?
अभिजीत बॅनर्जी यांचा जन्म 21 फेब्रुवारी 1961 मध्ये कोलकातामध्ये झाला. अभिजीत यांची आई कोलकाताच्या सेंटर फॉर स्टडिज इन सोशल सायन्समध्ये अर्थशास्त्राच्या प्रोफेसर होत्या. तर वडील दीपक बॅनर्जी हे देखील प्रेसिडन्सी कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख होते.
अभिजीत बॅनर्जी यांनी 1981 मध्ये प्रेसिडन्सी काँलेजमध्ये अर्थशास्त्राची पदवी घेतली. त्यानंतर दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात 1983 मध्ये अर्थशास्त्रात एमएचं शिक्षण पूर्ण केलं. 1988 मध्ये हार्वर्ड विद्यापीठात पीएचडीचं शिक्षण पूर्ण केलं.