Youngest Millionaire Of The World : प्रत्येक व्यक्ती समृद्ध जीवनशैलीची स्वप्ने पाहतो आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतो, परंतु काही लोक जन्मातच श्रीमंत असतात. आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात तरुण अब्जाधीशाची ओळख करून देणार आहोत. नायजेरियात फक्त नऊ वर्षांचा एक मुलगा आहे, ज्याला त्याच्या लक्झरी लाईफस्टाईलमुळे जगातील सर्वात तरुण अब्जाधीश म्हटले जाते. मोहम्मद अवल मुस्तफा (Muhammed Awal Mustapha) उर्फ​मोम्फा ज्युनियर (Mompha Junior) असे या मुलाचे नाव आहे. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, या मुलाकडे वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षीच एका मोठ्या बंगल्याची मालकी होती. इतकंच नाही तर, मोम्फा ज्युनियरकडे स्वतःचे खाजगी जेट देखील आहे ज्यातून तो जगभरात फिरतो. मॉम्फा ज्युनियरकडे आलिशान गाड्यांचे कलेक्शनही आहे. ज्यामध्ये बेन्टली (Bentley), लॅम्बोर्गिनी (Lamborghini) सारख्या गाड्यांचा समावेश आहे.


मोम्फा ज्युनियर नायजेरियन इंटरनेट सेलिब्रिटी आहे. तो सोशल मीडियावर सक्रिय असून त्याच्या लक्झरी लाईफस्टाईलचे फोटो नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याच्या इंस्टाग्राम पेजवर त्याचे 29 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.


अब्जाधीश नायजेरियन इंटरनेट सेलिब्रिटी इस्मालिया मुस्तफा नायजेरियाच्या लागोस येथील रहिवासी आहे. हा मोहम्मद अवल मुस्तफा यांचा मुलगा आहे. त्याचे वडील अवल मुस्तफाही इंटरनेट सेलिब्रिटी आहेत. मोम्फा त्यांच्या वडीलांप्रमाणेच कायम स्टायलिश आणि डिझायनर कपडे घालताना दिसतो. ज्यात वर्साचे (Versace) आणि गुची (Gucci) सारख्या लक्झरी ब्रँडचा समावेश आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha