Japan Earthquake : तुर्की (Turkey) आणि जपानमध्ये (Japan) भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले आहेत. युरोपियन मेडिटेरेनियन सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने माहिती देताना सांगितले की, पूर्व तुर्कीमध्ये 5.2 तीव्रतेचा भूकंप झाला आहे. त्याच वेळी, जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसाइन्सेस (जीएफझेड) ने सांगितले की जपानमधील होक्काइडो येथे 6.0 तीव्रतेचा भूकंप झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तुर्कीमध्ये भूकंपाच्या धक्क्यांमुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले असून यामध्ये 23 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या अहवालानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू मालत्या प्रांतातील येसिलर्ट शहरात होता. आदियमनमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.


भूकंपामुळे अनेक जण जखमी 


सोशल मीडिया पोस्टमध्ये माहिती देताना तुर्कीच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, मालत्या आणि अदियमन प्रांतात भूकंपामुळे इमारती कोसळल्यामुळे काही लोकांना दुखापत झाली आहे. भूकंपापासून वाचण्यासाठी लोकांनी इमारतीवरून उड्या मारल्या. यामुळे काही जण जखमीही झाले आहेत. माहिती देताना, युरोपियन मेडिटेरेनियन सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, गुरुवारी पूर्व तुर्कीमध्ये 5.2 तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंप 11 किमी खोलीवर होता.


मदतीसाठी अनेक पथके तैनात करण्यात आली


भूकंपाच्या ठिकाणी मदत कार्यासाठी अनेक पथके तैनात करण्यात आली असून, ते क्षेत्रीय सर्वेक्षण करून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला तुर्कस्तानला भूकंपाचा धक्का बसला आहे. दोन्ही प्रांत फेब्रुवारीमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे प्रभावित झाले होते, ज्यात तुर्की आणि सीरियामध्ये किमान 50,000 लोक मारले गेले होते. गुरुवारी झालेल्या भूकंपामुळे इमारतींचे काही नुकसान झाल्याची माहिती खाजगी प्रसारक NTV ने दिले आहे.


जपानमधील होक्काइडो येथे 6.0 रिश्टर स्केलचा भूकंप झाला


जपानमधील होक्काइडो येथे 6.0 तीव्रतेचा भूकंप झाला. सध्या या भूकंपामुळे कोणते नुकसान झाले याची अद्याप माहिती समोर आलेली नाही.   


अंदमान निकोबार बेटांवरही भूकंप झाला


अंदमान निकोबार बेटांवर गुरुवारी रात्री 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) ने सांगितले की, या ठिकाणी पहाटे 2.56 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. एनसीएसनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू 10 किमी खोलीवर होता.


महत्त्वाच्या बातम्या :


Russia Moon Mission: चंद्रावर भारताचा शेजारी असणार रशिया; 47 वर्षांनी Luna-25 लॉन्च, Chandrayaan-3 च्या आधी पोहचण्यासाठी धडपड