56 Year Old US Woman Gives Birth to Baby : जगात अनेक आश्चर्यकारक घटना आणि चमत्कार होत असतात. यावर लगेच विश्वास ठेवणं थोडं कठीण होऊन जाते. किंवा विश्वासच ठेवू शकत नाहीत. विशेषत: विज्ञानाच्या प्रगतीनंतर अदुभुत करणाऱ्या अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र, या ठिकाणी आम्ही तुम्हाला अशी एक घटना सांगणार आहोत जी खरंतर या सगळ्या बाबींवरून वेगळी ठरते. अमेरिकेतील नॅन्सी हॉक या 56 वर्षीय आजीने चक्क बाळाला जन्म दिला आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे, ज्या मुलाला लहानाचं मोठं केलं नॅन्सी तिच्याच मुलाच्या बाळाची आई झाली आहे.     


या जगात आल्यानंतर प्रत्येकाला आजी-आजोबांचं प्रेम हवं असतं. कारण त्या प्रेमामध्ये मायेचा ओलावा असतो. तसेच, घरातील सर्वात ज्येष्ठ सदस्य म्हणून आजी कायम आपल्या नातवंडांवर जास्तच प्रेम करते. पण, अमेरिकेतील उटाह शहरात राहणारी नॅन्सी हॉक ही सर्वसामान्य आजीपेक्षा वेगळी आहे. या आजीने स्वत:च आपल्या नातवाला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे, ही प्रक्रिया देखील यशस्वीरित्या पार पडली आहे.  


आजारपणामुळे सून आई होऊ शकली नाही


नॅन्सीची सून कॅम्ब्रिया ही हिस्टेरेक्टॉमी प्रक्रियेनंतर ती कोणत्याही बाळाला जन्म देश शकत नव्हती. कारण तिचे गर्भाशय तिच्या शरीरापासून वेगळे झाले होते. 32 वर्षीय जेफ हा व्यवसायाने वेब डेव्हलपर आहे. अशा परिस्थितीत जर मूल हवे असेल तर सरोगसीच्या माध्यमातून आपल्या मुलाला जगात आणणे हा एकच पर्याय होता. मात्र, जेव्हा कुटुंब वाढविण्याचा प्रश्न आला तेव्हा नॅन्सीने ही जबाबदारी स्वतः उचलण्याचा निर्णय घेतला आणि ती तिच्या निर्णयाशी खूप आनंदी आहे. नॅन्सीने यापूर्वी पाच निरोगी मुलांना जन्म दिला आहे आणि अजूनही तिला फारसा त्रास झालेला नाही.


56 वर्षीय नॅन्सीने हा निर्णय आपल्या कुटुंबियांसमोर ठेवला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पण, जेव्हा डॉक्टरांनी ही प्रक्रिया सुरक्षित असल्याचे घोषित केले तेव्हा घरातील सदस्य तयार झाले. नॅन्सीच्या घरातील हे पहिलेच बाळ आहे असे नाही. तर या आधीही त्यांच्या घरात चार मुले आहेत. या मुलांना तिच्या सुनेनेच जन्म दिला आहे. मात्र, नॅन्सीची ही घटना वेगळी ठरते.   


महत्वाच्या बातम्या : 


Viral Video : CISF चे दोन श्वान 10 वर्षांनंतर निवृत्त, जवानांकडून सन्मान; दिला शानदार निरोप! पाहा व्हिडीओ