Syed Mushtaq Ali Trophy 2022 Final: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा अंतिम सामना  मुंबई आणि हिमाचल प्रदेश (Himachal vs Mumbai) यांच्यात होणार आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईनं विदर्भाचा तर, हिमाचलनं पंजाबचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. स्पर्धेचा अंतिम सामना आज कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर होईल. 


कधी, कुठं रंगणार सामना?
मुश्ताक अली ट्रॉफीचा अंतिम सामना आज  (5 नोव्हेंबर 2022 ) हिमाचल प्रदेश विरुद्ध मुंबई यांच्यात खेळला जाणार आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर हा खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार, या सामन्याला दुपारी 4.30 वाजता सुरुवात होईल, यापूर्वी अर्धातास नाणफेक होईल. हिमाचलविरुद्ध मुंबई सामन्याचे थेट प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केलं जाईल. तसचे डिस्ने+ हॉटस्टारवर या सामन्याचे लाइव्ह स्ट्रिमिंग पाहता येणार आहे. तसेच या सामन्याशी संबंधित ताजी अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही एबीपी माझाच्या वेबसाईटवर भेट देऊ शकतात.


संघ-


हिमाचल प्रदेश:
प्रशांत चोप्रा, अंकुश बैंस (विकेटकिपर), अभिमन्यू राणा, सुमीत वर्मा, आकाश वसिष्ठ, निखिल गंगटा, पंकज जैस्वाल, ऋषी धवन (कर्णधार), एकांत सेन, मयंक डागर, कंवर अभिनय सिंग, वैभव अरोरा, गुरविंदर सिंग, राघव धवन, अंकुश बेदी, विनय गलेटिया, आयुष जामवाल, शुभम अरोरा. 


मुंबई:
पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, सर्फराज खान (विकेटकिपर), शिवम दुबे, शम्स मुलानी, अमन हकीम खान, तनुष कोटियन, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, परीक्षित वलसंगकर, धवल कुलकर्णी ठाकूर, पृथ्वीपाल सोळंकी, साईराज पाटील, सूर्यांश शेडगे, हार्दिक तामोरे.


हे देखील वाचा-