सॉफ्ट ड्रिंक्स आणि नूडल्ससारखे अरबट-चरबट पदार्थ खाण्याचा नाद, मुख्य म्हणजे जंक फूड खाण्याचा पोरांचा हट्ट पुरवण्याची पालकांची सवयच आर्यच्या अंगलट आली आहे. दिवसातून पाचवेळा भात, नूडल्स आणि मांस खाऊनही आर्यची भूक भागत नसल्याचं पालकांच्या लक्षात आलं आणि त्यांनी डॉक्टरांकडे धाव घेतली.
गलेलठ्ठ आर्यला पाहून डॉक्टरही अवाक झाले. त्यांनी आर्यसाठी सक्तीचा डाएट प्लान आखून दिला. मात्र त्यांचे हे प्रयत्न व्यर्थ ठरले, कारण चिमुरड्याचं वजन जराही कमी झालं नाही. अखेर पोटाचा ढेर कमी करण्यासाठी त्यांनी शस्त्रक्रियेचा पर्याय निवडला.
सर्जरीनंतर आर्यचं वजन 16 किलोंनी कमी झालं. नंतरच्या कालावधीत हे वजन आणखी दोन किलोंनी घटलं आहे. वर्षभरात आर्यचं वजन शंभर किलोच्या आत आणण्याचा डॉक्टरांचा मानस आहे. भूकेशी संबंधित हार्मोन्सवर नियंत्रण मिळवल्याने त्याची भूक आटोक्यात येईल, अशी आशा डॉक्टरांना आहे.
आर्यवर मेक्सिकोमध्ये उपचार सुरु आहेत. जगातील सर्वात लठ्ठ पुरुष असलेल्या जुआन पेड्रो फ्रँको याच्यावरही मेक्सिकोतच शस्त्रक्रिया झाली होती. काहीच महिन्यांपूर्वी जगातील तत्कालीन सर्वात लठ्ठ महिला इमान अहमदवरही मुंबईत सर्जरी झाली होती.