World Military Expenditure : आपल्या देशाचं संरक्षण करणं हे प्रत्येक देशाचं प्रथम कर्तव्य आहे. मग त्यासाठी हवा तेवढा खर्च करण्यास प्रत्येक देश तयार असतो. आपल्याकडे किती शस्त्रास्त्र शक्ती आहे हे दाखवून देण्याचा देखील अट्टाहास प्रत्येक देशाचा असतो. पण या सगळ्यात कितीतरी खर्च केला जातो. तोच खर्च SIPRI सादर केलेल्या अहवालातून समोर आलेला आहे. जगाने 2022 या वर्षात 2240 मिलियन डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांत 183 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत.
नेमकं म्हणतोय SIPRIचा अहवाल?
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार, जगाचा सैन्यावरील खर्च हा 183 लाख कोटी रुपये इतका झालेला आहे. यामध्ये अमेरिका हा प्रथम क्रमांकावर असून भारत चौथ्या स्थानावर आहे. 2022 मध्ये जागतिक लष्करी खर्चात 3.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2022 मध्ये झालेला खर्च हा आतापर्यंत झालेल्या खर्चापेक्षा सर्वाधिक असल्याचं देखील SIPRI ने म्हटलं आहे.
जगाच्या कोणत्या भागात सर्वाधिक खर्च?
SIPRI च्या अहवालानुसार, युरोपीय देशांत सर्वाधिक खर्च करण्यात आलेला आहे. युरोपीय देशांनी 13 टक्के खर्च लष्करी खर्चावर केलाय. यात युक्रेनचा सर्वाधिक म्हणजेच 44 अब्ज डॉलर खर्च केला आहे. याचे कारण म्हणजे रशिया आणि युक्रेनचे युद्ध. या युद्धाचा परिणाम म्हणून युरोपीय देशांत सर्वाधिक खर्च हा लष्करी शस्त्रांवर करण्यात आला आहे. तसेच टॉप 15 देशांनी एकूण खर्चाच्या 82 टक्के खर्च केला आहे.
कोणत्या देशांचा खर्च जास्त?
सर्वात जास्त खर्च हा अमेरिकेचा असून अमेरिकेने एकूण खर्चाच्या 39 टक्के म्हणजेच 877 अब्ज डॉलर खर्च केला आहे. त्यापठोपाठ चीनचा खर्च असून चीनने एकूण खर्चाच्या 13 टक्के म्हणजेच 292 अब्ज डॉलर खर्च केले आहेत. या यादीत भारताने चौथा क्रमांकवर असून 81 अब्ज डॉलर खर्च केले आहेत. हा खर्च एकूण खर्चाच्या 3.6 टक्के इतका आहे.
या दहा देशांचा खर्च सर्वाधिक....
- अमेरिका - 39%
- चीन - 13%
- रशिया - 3.9%
- भारत - 3.6%
- सौदी अरेबिया - 3.3%
- युनाटेड किंगडम - 3.1%
- जर्मनी - 2.5%
- फ्रान्स - 2.4%
- उत्तर कोरिया - 2.1%
- जपान - 2.1%
संबंधित बातमी