Adani Group Stock Crash : अदानी समूहाचे (Adani Group) सर्वच शेअर (Shares) आज पुन्हा गडगडले आहेत. अदानी समूहामध्ये 0.10 अंकांनी घसरण झाली आहे. सर्वात जास्त घसरण ही अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी टोटलमध्ये झाली आहे. शेअर बाजार उघडताच समूहाचे सगळे शेअर्स खाली येण्यास सुरुवात झाली. तसेच दुसरीकडे सोमवार, 24 एप्रिलला शेअर बाजाराची दमदार सुरुवात देखील झाली. 

शेअर बाजारात सेन्सेक्स (Sensex) आज 218.65 अंकांनी वधारत 59.873 अंकांवर सुरु झाला. तर निफ्टी (Nifty) 17,707 अंकांवर उघडला आणि त्यात 83.5 अंकांची वाढ झाली. शुक्रवारी सेन्सेक्स 59,655 अंकांवर स्थिरावला होता, तर निफ्टी 17,624.05 अंकांवर स्थिरावला. 

अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स किती अंकांनी घसरले?

अदानी पॉवरमध्ये बऱ्याच प्रमाणात घसरण पहायला मिळत आहे. याचे शेअर्स 1.78 पडत 195.70 अकांवर सुरु झाले. अदानी ग्रीन एनर्जीमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात घसरण पहायला मिळाली. एनएसईमध्ये हे शेअर्स 2.14 अंकांनी घसरत 896.60 रुपयांवर स्थिरावले. 

अदानी समूहाच्या या शेअर्समध्ये झाली कमी घसरण...

अदानी समूहाच्या एसीसी सिमेंट (ACC Cement) कंपनीचे शेअर्समध्ये 0.8 अंकांची घसरण होत 1,716.50 रुपये प्रति शेअरने सुरुवात केली. अदानी एंटरप्रायजेसमध्ये 1,800 रुपये प्रति शेअरने सुरुवात झाली आणि यात 0.17 अंकांनी घसरण झाली. अदानी पोर्टमध्ये 0.11 अंकांनी घसरण होत त्याचे शेअर 660.85 रुपयांवर स्थिरावले. 

अदानी समूहाच्या शेअर्सची सद्यस्थिती...

कंपनीचे नाव 
आजचे अदानी शेअर्सचे स्थिरावलेले अंक
(एनएसई) 
शेअर्समध्ये झालेली घसरण
अदानी एंटरप्राईजेस  1,800.00  -0.17
अदानी ग्रीन  896.60  -2.14
अदानी पोर्ट  660.85  -0.11
अदानी पॉवर  195.70  -1.78
अदानी ट्रान्समिशन  983.85   -1.11
अदानी विल्मर  399.60  -1.16
अदानी टोटल गॅस  905.15  -1.38
एसीसी सिमेंट  1,716.50  -0.08

अदानी समूहासाठी हे वर्ष कठीण...

गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी समूहासंबंधित बातम्यांचा परिणाम अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्सवर गेल्या काही महिन्यांपासून दररोज दिसून येत आहे. गौतम अदानी आणि अदानी समूहासाठी हे वर्ष तसं जरा कठीणच गेलं. हिंडेनबर्गचा रिपोर्ट आल्यानंतर अदानीच्या शेअर्समध्ये घसरण्याची मालिका सुरुच झाली. दररोज घसरणारे शेअर्स याचा अदानी समूहाला तसा बऱ्यापैकी फटका बसला. अदानी समूहावर कर्जाचा देखील बराच डोंगर आहे. त्यात शेअर्सची होणारी घसरण ही अदानी समूहासाठी धोक्याची घंटा तर ठरणार नाही अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे. गौतम अदानींच्या एकूण संपत्तीत देखील बऱ्यापैकी घट झालेली आहे. तसेच अदानी कंपनीला 120 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे.