Robotic Uterus Transplant : रोबोटच्या मदतीने एका स्वीडिश महिलेच्या गर्भाशयाचे प्रत्यारोपण (Uterus Transplant ) करण्यात आले आहे. या प्रत्यारोपणानंतर संबंधित महिलेला बाळ देखील झाले आहे. विज्ञानच्या जोरावर आज आपण काहीही करु शकतो. याचे सगळ्यात मोठे उदाहरण आहे ते म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात करण्यात आलेली रोबोटिक सर्जरी. रोबोटिक सर्जरीचा वापर करुन अवघडातील अवघड सर्जरी आता अगदी सहज करता येऊ शकते. याचाच वापर करुन एका स्वीडिश महिलेच्या गर्भाशयाचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे. प्रत्यारोपण केल्यानंतर या महिलेने गोंडस बाळाला देखील जन्म दिला आहे. मागच्या महिन्यात महिलेने बाळाला जन्म दिला असून बाळ आणि ती महिला दोघेही सुखरुप आहेत. गर्भाशयाशी संबंधिक काही कारणांमुळे ज्या महिला आई होऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी हे एक वरदान ठरणार आहे. स्वीडनमधील युनिव्हर्सिटी ऑफ गोथेनबर्गच्या सहलग्रेन्स्का युनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या टीमने माहिती देताना सांगितले की, जन्माच्या वेळी बाळाचे वजन 3 किलो आणि 100 ग्रॅम होते. 35 वर्षीय आई आणि दाता सर्व ठीक आहेत.


रोबोटिक गर्भाशय प्रत्यारोपण आणि सुदृढ बालकाचा जन्म 


ऑक्टोबर 2021 मध्ये सहलग्रेन्स्का विश्वविद्यालय हाॅस्पिटलमध्ये पहिल्यांदा रोबोटच्या साहाय्याने गर्भाशयाचे प्रत्यारोपण करण्यात आले होते. सुरुवातीला महिलेची प्रजनन क्षमतेसह सर्वा तपासण्या करण्यात आल्या. त्यानंतर आयव्हीएफ टेक्नोलॉजीचा वापर करुन महिलेला गर्भधारणा झाली. डाॅक्टरांच्या माहितीनुसार, गर्भधारणेच्यावेळी संबंधित महिलेला चांगले वाटत होते. तिने 38 व्या आठवड्यात सी सेक्शनद्वारे बाळाला जन्म दिला. अडाॅक्टरने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 14 महिलांवर गर्भाशय प्रत्यारोपण करण्यात आले आहे. डॉक्टरांनी पुढे असेही सांगितले की, या रोबोटच्या मदतीने अजून अनेक शस्त्रक्रिया आम्ही करणार आहोत. 


अशाप्रकारे झाले गर्भाशयाचे प्रत्यारोपण 


महिलेवर मिनिमली इनवेसिव्ह शस्त्रक्रिया करण्यात आली. मिनिमल इवेसिव्ह सर्जरी ही अशी आहे की, ज्यामध्ये शरीरावर मोठी जखम न करता शस्त्रक्रिया केली जाते. यामध्ये शरीरावर कोणत्याही जखमेशिवाय ही सर्जरी होते. पारंपारिक खुल्या शस्त्रक्रियेच्या तुलनेत दात्यासाठी ही पद्धत कमी किचकट असते. योग्य आणि चांगल्या टेक्नोलॉजीचा वापर करुन ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ज्या महिलेच्या ओटीपोटात गर्भाशयाच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली तिच्याबाबतही अशीच प्रक्रिया राबवण्यात आली. एक लहान चीर देऊन दात्याचं गर्भाशय घेतले आणि ते स्वीकरणाऱ्या महिलेच्या ओटीपोटात त्याचं प्रत्यारोपण केलं. या सर्व टप्प्यांमध्ये रोबोटिक शस्त्रक्रियेद्वारे मदत घेण्यात आली.


इतर महत्वाच्या बातम्या


Skin Care : उन्हाळ्यात तुमच्या कपाळावर जबरदस्त टॅनिंग होते का... 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर