वाशिम : मासिक पाळी (Menstrual Cycle) ही स्त्रियांच्या आयुष्यातील नैसर्गिक प्रक्रिया आहे. यामुळे स्त्रीला मातृत्वाचा अनुभव घेता येतो. मात्र, याबाबत पूर्वीपासून अनेक गैरसमज आहेत.  मासिक पाळीबाबत सामाजिक गैरसमज दूर व्हावेत...अन् महिलांचे खच्चीकरण होऊ नये, यासाठी  वाशिम येथील क्षितीज फौंडेशनने पाऊल उचलले आहे.  शाळा आणि महाविद्यालयीन  संस्थेला सोबत घेऊन मासिकपाळी दरम्यान  सर्व सुविधा  एका खोलीत उपलब्ध व्हाव्या याकरता  आंनदी रूमची स्थापना केली  आहे.  


आजच्या विज्ञान-तंत्रज्ञान्याचा युगातही मासिक पाळीविषयीचे समाजात अज्ञान आणि गैरसमज असणे ही दुर्दैवाची बाब असून याबात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यसाठी हे पाऊल उचलले आहे. शालेय महाविद्यालयीन  शिक्षण घेतांना मासिकपाळी दरम्यान तरुणींना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता या खोलीची निर्मिती करण्यात आली आहे.  


कशी आहे आनंदी रूम?



  • आनंदी  रूम म्हणजे ही खोली मुलींच्या सोयीसाठी असणार आहे. जेव्हा मुलींना आरामाची आवश्यकता असेल तेव्हा त्यांना तेथे आराम करता येणार आहे.  खोलीमध्ये मुलींसाठी प्रेरणादायी घोषवाक्य वाक्य लिहण्यात आले आहेत.

  • मुलींना पिण्यासाठी व वापरण्यासाठी स्वच्छ पाणी आणि  त्याचबरोबर  मासिक पाळी दरम्यान  लागणाऱ्या सर्व सुविधा आहे. त्यामुळे किशोवयीन मुलींचे शाळा आणि महाविद्यालयामधील गळतीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

  • खोलीमध्ये पुढील सुविधा असणार आहेत. नॅपकिन वेंडिंग मशीन, पॅड डिस्पोजल मशीन,  आरमासाठी बेड, प्रथमोपचार किट(First Aid Box), स्वच्छतेच्या संबंधित मार्गदर्शक सूचना आणि स्वच्छतेसाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी (स्वच्छ पाणी, साबण, hand wash,कपडे वाळत घालण्यासाठी दोरी, डस्टबिन, इ.)

  • स्त्रीरोग तज्ज्ञ व त्यांचे मार्गदर्शन मुलींसाठी उपलब्ध असणार आहे

  • शाळा महाविद्यालयांमध्ये मासिक पाळी दरम्यान मुलींना पुरेसे पाणी, स्वच्छतागृहे, पॅड बदलण्यासाठी जागा, पॅडची विल्हेवाट करण्यासाठीच्या उपायोजना करण्यात आली आहे.

  • शारीरिक त्रास होत असल्यास आरामासाठीची सोय अशा अनेक सोयी सुविधा नसल्यामुळे  मुलींच्या  शाळा महाविद्यालयातून गळतीचे प्रमाण वाढत आहे.ते कमी  करण्यासाठीचा हा एक प्रयत्न आहे.


उल्हासनगरमध्ये एका 12 वर्षांच्या मुलीची तिच्या सख्ख्या भावानं निर्घृण हत्या केली. ही मुलगी तिचा भाऊ आणि वहिनीसोबत राहात होती. या मुलीला नुकतीच पहिल्यांदा मासिक पाळी आली होती. पण तिच्या वहिनीनं त्यावरून आपल्या नवऱ्याला चुकीची माहिती दिली. त्यानंतर त्यानं कुणाशी तरी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून आपल्या बहिणीला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. त्यानं बहिणीला सांडशीनं चटकेही दिले. हा छळ सहन न होऊन बारा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला.   तर जादूटोणासाठी मासिक पाळीचे रक्त ही विकण्याच्या  घटना  समोर  आल्या आहेत. अशा परिस्थितीत क्षितीज फौंडेशनच्या  स्नेहल चौधरी यांनी तरुणींसाठी उचललेले पाऊल हे  कौतुकास्पद आहे.  येत्या  काळात  जिल्ह्यातील  सगळ्या शाळा महाविद्यालयामध्ये आनंदी रूमची स्थापना  केली तर तरुणीचे  शिक्षण  मध्ये व्यत्यय न येता चांगल्या  प्रकारे  शिक्षण  मिळण्यास मदत मिळेल. 


हे ही वाचा :


स्पेनमध्ये मासिक पाळीच्या दिवशी महिलांना सुट्टी जाहीर, भारतातही सुट्टी द्यावी की कामात सूट द्यावी? काय वाटतं पुरुषांना?