Washim News update : सर्वांना मोफत, सक्तीचे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे आणि राज्यातील (government school in maharashtra) एकही शाळा पटसंख्येअभावी बंद करण्यात येऊ नये, यासाठी राज्यभरातील विविध शिक्षक संघटनांच्या माध्यमातून वाशिम येथील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात येत्या आठ जानेवारी रोजी राज्यस्तरीय शाळा बचाव परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, राज्य सरचिटणीस विजय कोंबे, राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर यांनी केले आहे.


भारतातील प्रसिद्ध शिक्षण तज्ञ डॉ. अनिल सद्गगोपाल Anil Sadgopal (भोपाळ ) हे या परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. परिषदेच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक समितीचे प्रभाकर आरडे (कोल्हापूर) यांची उपस्थिती लाभणार आहे. मध्यप्रदेश येथील जागृत आदिवासी महिला संघटनेच्या माधुरी कृष्णास्वामी आणि सत्यशोधक शिक्षक सभेचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र शिक्षण बचाव समन्वय समितीचे निमंत्रक रमेश बीजेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. वाशिम येथील एस एम सी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. हरिभाऊ क्षीरसागर हे या परिषदेचे स्वागताध्यक्ष आहेत.


राष्ट्रीय शिक्षण धोरण : एक चिकित्सा या विषयावर परिसंवाद


उद्घाटन सत्रानंतर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आलेल्या शाळा बचाव मोहिमेच्या कार्याच्या अहवालाचे वाचन होणार आहे. या सत्रामध्ये पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक दत्तात्रय वारे हे प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत. अकोला येथील शेतकरी जागरुक मंचाचे प्रशांत गावंडे हे या पहिल्या सत्राचे अध्यक्ष राहणार आहेत. परिषदेच्या दुसऱ्या सत्रामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण : एक चिकित्सा या विषयावर परिसंवाद होणार आहे. यामध्ये पुणे येथील अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेचे शरद जावडेकर आणि गडचिरोली येथील सत्यशोधक शिक्षक सभेचे प्रा. संतोष सुरडकर हे आपले विचार मांडणार आहेत.


या परिषदेच्या समारोपीय सत्रामध्ये भारतीय शिक्षण व्यवस्थेबाबत विविध ठराव पारित करण्यात येणार आहेत. ठरावांचे वाचन प्रशांत देशमुख हे करणार आहेत. यावेळी राम श्रृंगारे, प्रभाकर गायकवाड आणि एकनाथ धवसे यांचा सहभाग राहिल. या परिषदेला राज्यभरातील शिक्षक तथा शिक्षण चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तरी जिल्ह्यातील शिक्षक, शाळा व्यवस्थापन समित्यांचे पदाधिकारी, सरपंच सामाजिक कार्यकर्ते तथा पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षक समिती अमरावतीचे जिल्हाध्यक्ष गोकुलदास राऊत, जिल्हा सरचिटणीस संभाजी रेवाळे, कार्याध्यक्ष प्रशांत निमकर, कोषाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, शैलेन्द्र दहातोंडे, महिला आघाडी प्रमुख सरीता काठोळे, कार्याध्यक्ष सुषमा वानखडे, कोषाध्यक्ष भावना ठाकरे, संगिता तडस, राज्य महिला प्रतिनिधी प्रविणा कोल्हे आदिंनी केले आहे.


ही बातमी देखील वाचा...


आयुर्वेद एमडीच्या जागांमध्ये कपात; 249 पैकी फक्त 160 जागांवरच होणार प्रवेश


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI