Washim Hospital Issue : आरोग्य सुविधांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केल्याचा दावा शासनाकडून केला जात असतानाच वाशिममधून (washim latest news updates) एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया सुरु असताना वीजपुरवठा खंडित झाल्यानं वाशिममध्ये डॉक्टरांवर मोबाईलच्या टॉर्चचा (washim News govt hospital Power cut during surgery in Washim Doctors performed 10 operations with help of mobile torch) आधार घेत ऑपरेशन करण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीतही ऑपरेशन्स पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांचं मात्र सर्वत्र कौतुक होत आहे. 


वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे डॉक्टरांनी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात 10 महिलांच्या शस्त्रक्रिया केल्या. वाशिमच्या राजाकिन्ही आरोग्यवर्धिनी केंद्रात जनरेटर, इनव्हर्टरची सोय नसल्याने डॉक्टरांवर ही वेळ आली. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने 10 महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया मोबाईल टॉर्चच्या मदतीने केल्या गेल्याचं समोर आलं आहे. 


या प्रकरणात डॉक्टरांनी ही तत्परता दाखवली असली तरी आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार या निमित्तानं समोर आला आहे. हॉस्पिटलला विजेच्या पुरेसा पुरवठा न होणं या गोष्टी आरोग्य यंत्रणेची लक्तर वेशीवर टांगणाऱ्या तर आहेत, पण, अनेकांच्या जीवाशी खेळही होत असल्याची नागरिकांची भावना आहे. हा प्रकार अत्यंत संतापजनक असल्याची भावना रुग्ण आणि नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.  


डॉक्टरांनी तत्परता दाखवली पण...


काल रात्री जवळपास वीस महिलांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया असताना वारंवार विद्युत पुरवठा खंडित होऊन अडथळा येत होता. यामुळं शस्त्रक्रियेत अडथळा येऊ नये याकरता डॉक्टरांनी तत्परता दाखवत मोबाईल टॉर्चचा आधार घेतला. मात्र आरोग्यवर्धिनी केंद्रात इन्व्हर्टर, जनरेटरची सुविधा नसल्याने आश्चर्य व्यक्त केली जात आहे. 


इन्व्हर्टर आणि जनरेटर बंद अवस्थेत


डॉ एस के झळके यांनी यावर बोलताना म्हटलं की, रात्रीच्या प्रकरणात 18 ते 20 ऑपरेशन्स करायचे होते. या ऑपरेशन्सला विलंब झाला. रात्री 10 मिनिटं लाईटही गेली होती. सोलर आहे मात्र तो वर्किंग नाही, त्यामुळं विलंब झाला. यामुळं मोबाईलच्या उजेडाचा आधार घेतला जो योग्य नाही. इन्व्हर्टर आणि जनरेटर बंद अवस्थेत आहे. आपल्या जिल्ह्यात सर्जन कमी आहेत. त्यांच्यावर कामाचा लोड जास्त आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. 


या प्रकारानं रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. आता या प्रकरणी प्रशासनाकडून नेमकी काय कार्यवाही केली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



ही बातमी देखील वाचा