Washim Crime News : वाशिम जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. व्यापाऱ्याला भर रस्त्यावर अडवून 1 कोटी 15 लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केली होती. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केल्यानंतर अवघ्या 24 तासाच्या आतच आरोपींना जेरबंद केलं आहे. व्यापाऱ्यांच्या विश्वासू नोकरांनीच कट रचून हा प्रकार केल्याचे पोलिस तपासात उघड झालं आहे.
नेमकी कशी घडली घटना?
वाशिमच्या अकोला हैद्राबाद महामार्गावरील हिंगोली रोडवरील रेल्वे उडाण पुलावरुन काल संध्याकाळच्या सुमारास एका खसजगी बाजार समितीच्या व्यापाऱ्याला भर रस्त्यावर अडवून 1 कोटी 15 लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली होती. दरम्यान या घटनेचा पोलिसांनी कसून तपास केला असता, या प्रकरणातील आरोपी हे व्यापाऱ्यांचे विश्वासू नोकरदार असल्याचे उघ़ झाले आहे. नोकरांनी कट रचून अज्ञातांनी हल्ला केल्याचा बनाव केल्याचं पोलीस तपासातून उघड झालं आहे. या प्रकरणातील आरोपी ज्ञानेश्वर बैस आणि विठ्ठल हजारे या दोघांना पोलिसांनी रोख रकमेसह ताब्यात घेतलं आहे.
बारामती विहीरीवरील विद्युतपंप, चोरी करणारी टोळी गजाआड
बारामती तालुक्यातील जिरायती भागात विहीरीवरील विद्युतपंपाच्या चोरी करण्याला टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. वडगाव निंबाळकर पोलीसांनी पाणबुडी, विद्युतपंप चोरी प्रकरणात सराईत 6 गुन्हेगारांना अटक केली आहे. गुन्हयातील एकुण 3 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ओंकार आरडे, महेश भापकर, अमोल कदम, निलेश मदने, प्रथमेश कांबळे अशी आरोपींची नावं आहेत. सर्व आरोनींना अटक करण्यात आली आहे. विद्युतपंप चोरीचे 17 गुन्हे उघड झाले आहेत. तसेच त्यांचेकडुन इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. दरम्यान, यावेळी आरोपींनी व्यापाऱ्यांना मारहाण देखील होती. यामध्ये व्यापारी जखमी झाला होता. दरम्यान, या घटनेनंतर पोलिस सतर्क झाले होते. जागोजाही पोलिसांनी नाकाबंदी केली होती. पोलिसांनी कसून तपास करत अवघ्या 24 तासांच्या आतच आरोपींना जेरबंद केलं आहे.
अलिकडच्या काळात विहीरीवरील विद्युतपंपाच्या चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनेक ठिकाणी या घटना उघडकीस आल्या आहेत. यामुळं पोलिस प्रशासन देखील सतर्क झालं आहे. बारमीती तालुक्यातील एका टोळीला सध्या पोलिसांनी जेरबंद केलं आहे. आणखी कोणी यामध्ये सामील आहे का? याचा पोलिस तपास घेत आहेत.
महत्वाच्या बातम्या: