Congress Nana Patole On EVM : निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर बऱ्याचदा काँग्रेसकडून ईव्हीएमवर (Congress On EVM) आक्षेप घेण्यात आला आहे. खासकरुन भाजपची सत्ता आल्यानंतर ईव्हीएमवर विरोधकांकडून वेळोवेळी प्रश्नचिन्ह उभं केल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी  EVM मशीनच एक प्रकारे समर्थन केलं आहे. संघटित होऊन एक गठ्ठा मतदान करा तर evm मशीन आपल्याकडून असेल, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. हे वाशिम इथं अमरावती विभागीय पदवीधर निवडणुकीचे काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे यांच्या प्रचारार्थ वाशिम येथे बोलत होते.



नाना पटोले म्हणाले की, पश्चिम बंगालच्या निवडणुकीवेळी देशाचे पंतप्रधान तिकडे फिरत होते. पण तरीही तिथं भाजपचं सरकार आलं नाही. आपल्याकडे मतविभाजनामुळं यांचं सरकार आलं. एकजुटीनं आपण गेलो तर आपल्याला कुणी रोखू शकणार नाही, असं पटोले म्हणाले.  


 नाना पटोले  यांनी विधानसभेचे अध्यक्ष असताना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसंच विधानसभा निवडणुकीत मतदारांना इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनसह (EVM) मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याचा पर्यायसुद्धा उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना केली होती. महाराष्ट्र विधानमंडळाने यासंदर्भात कायदा करावा, अशी मागणीही नाना पटोले यांनी  केली होती. आता मात्र त्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ईव्हीएमचं समर्थन केल्याचं दिसत आहे.  


रेशम बागेतील 78  लोकांना  UPSC मध्ये  थेट समावेश करून घेतलं


 नाना पटोले  यांनी पुढं म्हटलं की, UPSC मधून  येणारी मुलं मुली सर्वसामान्य घरातून येणारे  असतात. मात्र 2019  मध्ये  केंद्राच्या  मोदी सरकारने   UPSC ची परीक्षा  न घेता त्यांच्या  व्यवस्थेसाठी   नागपूरच्या  रेशम बागेतील 78  लोकांना  UPSC मध्ये  थेट समावेश करून घेतलं असल्याचा आरोप   नाना पटोले यांनी केला.
 
नाना पटोले यांनी म्हटलं की, नीती आयोगामध्ये मोदी सरकारने अशी व्यवस्था केली कि कुठल्याच नोकरदाराला पेन्शन द्यायची  नाही, तो पैसा त्यांच्या मित्रांकडे वळवायचा. छत्तीसगड, राजस्थान राज्यात आम्ही  पेन्शन योजना देण्याचं ठरवलं मात्र त्यासाठीनीती आयोग पैसा देणार नाही. मोदी सरकार आणि भाजप हा महापुरुषांचा अवमान करणारा पक्ष ठरलाय.  तसेच शेतकरी विरोधी पक्ष देखील ठरलाय.  तसेच  देशाच्या संविधानाला देखील मानायला तयार  नाही, असंही नाना पटोले म्हणाले.


नेमकं काय म्हणाले नाना पटोले- पाहा व्हिडीओ