Wardha Lok Sabha 2024 : प्रहार जनशक्ती (Prahar Janshakti) पक्षाचे पक्ष प्रमुख बच्चू (Bacchu Kadu) कडू यांनी वर्ध्यातून लोकसभा निवडणूक (Wardha Lok Sabha 2024) लढविण्याचा आग्रह वर्ध्यात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. वर्ध्यात अद्याप महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर झाला नसताना प्रहारच्या कार्यकर्त्यांनी धरलेल्या आग्रहावर बच्चू कडू सध्या सकारात्मक झाले असल्याचे बोलले जात आहे. बच्चू कडू यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी यासाठी सावंगी येथे प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आगळा वेगळा उपक्रम हाती घेत बच्चू कडूकडे गळ घातली आहे. यात प्रहरच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी रक्तदान शिबिर आयोजित करत सामाजिक उपक्रम राबवून बच्चू कडू यांनी लोकसभा लढविण्याचा आग्रही मागणी लावून धरली आहे. आता या मागणीवर बच्चू कडू नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


वर्धा लोकसभा मतदारसंघातून बच्चू कडू निवडणुकीच्या रिंगणात? 


एकीकडे अमरावती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार नवनीत राणा यांना महायुतीचे उमेदवार म्हणून तिकीट जाहीर झाले आहे. मात्र त्यांच्या नावाला महायुतीचा घटकपक्ष असेल्या प्रहारच्या बच्चू कडू आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून कडाडून विरोध होत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमख बच्चू कडू (Bacchu Kadu) हे नवनीत राणा यांच्याविरोधात उमेदवार देणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र हा उमेदवार नेमका  कोण असेल या बाबत बच्चू कडूंनी सस्पेन्स राखून ठेवला आहे. अशातच आता शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव अभिजित अडसूळ यांनीदेखील राणा यांच्याविरोधात दंड थोपटले आहे. त्यांनी राणांच्या उमेदवारीला थेट विरोध केला असून वेळ आली तर मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची तयारीही बोलून दाखवली होती.


अशातच आज त्यांनी अमरावती लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज घेतले आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख प्रशांत हरणे यांनी अभिजित अडसूळ यांच्या नावाने तीन उमेदवारी अर्ज घेतल्याची माहितीही पुढे आली आहे. त्यामुळे नवनीत राणा यांच्या विजयाच्या मार्ग फार सुखर नसणार हे उघड आहे. अशातच  बच्चू कडू यानी स्वत: अमरावती मतदारसंघातून न लढता वर्धा लोकसभा मतदारसंघातून लढावे, अशी आग्रही मागणी प्रहरच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी बच्चू कडू यांच्या कडे केली आहे.


बच्चू कडूच्या भूमिकेकडे सऱ्यांचे लक्ष 


सध्याघडीला वर्धा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अमर काळेंच्या (Amar Kale) नावावर शिक्कामोर्तब केला गेलाय. या उमेदवारीबाबत काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांनी स्वत: दुजोरा दिला आहे. तसेच लवकरच आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची तुतारी हाती घेणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहे. असे असताना महायुती मधून अद्याप या मतदारसंघातून एकही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे बच्चू कडू यानी या मतदारसंघातून आपली उमेदवारी जाहीर करावी, अशी आग्रही मागणी बच्चू कडू यांच्या कडे करण्यात येत आहे. मात्र या बाबत बच्चू कडू नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या