वर्धा :  पती-पत्नीमध्ये भांडण (Husband Wife Dispute) होत असते. मात्र, काही वेळा या भांडणाचा परिणाम फार धक्कादायक होतो, याची प्रचिती वर्ध्यात आली आहे. वर्ध्यात (Wardha Crime News) मजुरीच्या पैशांवरून पती पत्नीचे भांडण झाले आणि या भांडणाचे  रुपांतर मात्र, एका धक्कादायक घटनेत झाल्याचे समोर आले आहे.  मजुरीच्या पैशाच्या कारणातून झालेल्या वादात संतप्त पतीने पत्नीचे डोके जमिनीवर ठेचून तिची हत्या करण्यात आली आहे वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव येथील दखनी फैल परिसरात घडली. याप्रकरणी आरोपी पतीला पुलगाव पोलिसांनी  बेड्या ठोकल्या. मंगला राजेश राजगत्ता (45 रा. दखनी फैल, पुलगाव) असे मृतकाचे नाव आहे तर राजेशसिंग राजदत्ता (55) असं आरोपी पतीच नाव असून पोलिसांना याला अटक केली आहे.


पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, राजेशसिंग राजदत्ता याचा पत्नी मंगला हिच्यासोबत मजुरीच्या पैशाच्या कारणातून वाद झाला होता. याच कारणातून संतप्त राजेशसिंग याने पत्नी मंगलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन तिचे डोके जमिनीवर आपटून तिची हत्या केली. याप्रकरणाची तक्रार राहुल रामदास चांनपुरकर (43) याने पुलगाव पोलिसांत दिली. पुलगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दारासिंग राजपूत यांनी घटनेची दखल घेत आरोपी राजेशसिंग याला दखनी फैल परिसरातून अटक करीत बेड्या ठोकल्या. पुढील तपास पुलगाव पोलिस करीत आहेत. 


झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात सिलेंडर मारला


काही दिवसांपूर्वी नागपुरात देखील अशीच एक घटना घडली. रागात पतीने चक्क पत्नीच्या डोक्यात सिलेंडर घालून हत्या करण्यात आली. नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील टेकऑफ सिटी परिसरात घडली. या घटनेत पतीने पत्नीच्या डोक्यात सिलेंड मारुन खून केला. नयर शफी खान असं मृत महिलेचं नाव आहे. नयर शफी खान आणि तिचा पती समीर मोहम्मद अन्सारी हे दोन वर्षांपासून फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होते. त्यांच्यात कौटुंबिक कारणावरुन वाद झाला होता. त्या वादामुळे पती समीर मोहम्मद अन्सारी हा रागात होतात. त्यातूनच त्याने काल (13 ऑगस्ट) रात्री दीड ते दोनच्या सुमारास पत्नी झोपली असताना तिच्या डोक्यावर सिलेंडर मारुन हत्या केली. यानंतर आरोपीने स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.


हे ही वाचा :                       


वर्ध्यात एकतर्फी प्रेमाची क्रूरता; तरुणीला घराबाहेर बोलवलं, नंतर अंगणात चाकूने गळ्यावर वार करत केला खून