वर्धा : वर्ध्यातील केळझर येथे ट्रॅव्हल्स आणि बसचा भीषण (Wardha Accident)  अपघात झाला आहे. या अपघातात 20 प्रवासी जखमी झाले आहे. तर  तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे,   केळझर येथील शहीद चौकात ही  घटना घडली आहे.तीन प्रवाशाची प्रकृती गंभीर असून सध्या जखमींना सेलू, सेवाग्राम येथील  जवळील  रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.सेलू पोलीस घटनास्थळी दाखल  झाले आहे. 


प्राथमिक माहितीनुसार, ट्रॅव्हल्स चालकाला  डुलकी लागल्याने किंवा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. ट्रॅव्हल्सने एसटी बसला धडक दिली आहे. समोरासमोर धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.  यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत. 


एसटीला खाजगी बसची धडक


सेलू येथील बृहस्पती मंदिरातून आजनसरा येथे  प्रवासी घेऊन ट्रॅव्हल निघाली  होती,   दरम्यान,  केळझर येथील शहीद चौकाजवळ ट्रॅव्हल्स येताच नियंत्रण सुटल्याने समोरुन येणाऱ्या एसटीला भरधाव खाजगी बसने धडक दिली. या ट्रॅव्हल्सचा वेग अधिक असल्याने या अपघातात एसटी बसचे प्रचंड नुकसान झाले आहे. ट्रॅव्हल्समधील सर्व हे टाकळघाट येथील असल्याची माहिती समोर आली आहे.    या बसमधील 16 प्रवासी तर एसटी बसमधील चालकासह चार प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये तीन जणांची प्रकृती गंभीर आहे.  जखमी मध्ये चार लहान मुलांचा समावेश आहे. 


तीन प्रवाशांची प्रकृती चितांजनक


अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या  शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे. मात्र, यात  तीन प्रवाशांची प्रकृती चितांजनक असल्याचेही बोलले जात आहे.   


संभाजीनगर -पुणे महामार्गावर रात्री कंटेनर आणि ट्रॅव्हल्सचा अपघात


संभाजीनगर -पुणे महामार्गावर रात्री कंटेनर आणि ट्रॅव्हल्सचा अपघात झाला आहे. संभाजीनगरच्या ढोरेगावजवळ हा अपघात झाला आहे.  या अपघातात ट्रॅव्हलमधील एकूण 18  प्रवासी जखमी असून  चार गंभीर जखमींना प्राथमिक उपचार करून घाटी रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की ट्रॅव्हलचा पुढचा भाग चक्काचूर झाला आहे. तर अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना तात्काळ गंगापूर रुग्णालयात दाखल केले.


हे ही वाचा :


'मेरा बच्चा अच्छा था.. त्याची काही चूक नव्हती,त्याला अमानुषपणे का मारलं?' अनिसच्या आईचा काळजाचं पाणी करणारा आक्रोश