Wardha Accident: समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) वर्ध्यात (Wardha) चेनेज 39 जवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अकोल्याहून (Akola) भरधाव वेगोनं येणारी कार ट्रकवर जाऊन धडकल्यामुळं अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात (Accident News) तीन जण ठार झाले आहेत. दरम्यान, अपघात झाल्यामुळे काही काळासाठी समृद्धी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, घटनास्थळाची पाहाणी करु वाहतूक सुरळीत केली.
वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील महाबळा परिसरात समृद्धी महामार्गांवर ट्रकला भरधाव कारनं मागून धडक दिल्याची घटना घडली. यात कारमधील दोन डॉक्टर मैत्रिणींसह एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात रात्री साडेबारा वाजता घडला. डॉक्टर ज्योती क्षीरसागर (रा. मालेगाव, जिल्हा -वाशीम), डॉक्टर फाल्गुनी सुरवाडे (राहणार, अमरावती), भरत क्षीरसागर (रा. मालेगाव, जिल्हा -वाशीम) अशी मृतांची नावं आहेत. घटनेची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलीस चौकीतील पोलीस उपनिरीक्षक दिलीप थाटे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचत वाहतूक सुरळीत केली आहे.
समृद्धी महामार्गानं नागपूरच्या दिशेनं जात असलेल्या ट्रकला भरधाव वेगात असलेल्या कारनं मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात मालेगाव येथून नागपूरला जात असलेल्या कारमधील दोन डॉक्टर मैत्रिणींसह एकाचा जागीच मृत्यू झाला. ज्योती क्षीरसागर आणि फाल्गुनी सुरवाडे या दोन्ही डेंटिस्ट डॉक्टर असून मैत्रीण आहेत. नागपूरला कामानिमित्त रात्री समृद्धी महामार्गानं जात असताना ज्योती क्षीरसागर हिचं कारवरील नियंत्रण सुटलं. भरधाव वेगात असलेली कार ही समोरील ट्रकला मागून धडकली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, जाम महामार्ग पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी येत वाहतूक सुरळीत करण्यात आली. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत सेलू पोलिसांना माहिती दिली आहे. तीनही मृतदेह सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलीस अपघातासंदर्भात अधिक चौकशी करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :