Wardha News : वर्धा (Wardha) जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील कासारखेडा या गावातील एका शेतकऱ्यानं अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी यंत्र निर्मितीचा (Machine manufacturing) यशस्वी प्रयोग केला आहे. या यंत्रांचा शेतकऱ्यांना (Farmers) चांगला फायदा होत आहे. योगेश लीचडे (Yogesh Leachde) असे शेतकऱ्याचे नाव आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मिनी ट्रॅक्टर, पॉवर विडर, पावर ट्रेलर यासारखी यंत्रे तयार केली आहेत. आंतर मशागत आणि तण नियंत्रणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या यंत्राचा फायदा उत्पादनात वाढ होण्यासाठी होत आहे.


शेतीमधील कामासाठी मजूर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळं शेतातील कामे वेळेवर पार पाडली जात नसल्यानं शेतकऱ्याला नुकसान सहन करावं लागतं. त्यासाठीच कासारखेड येथील शेतकऱ्याचा हा यंत्र निर्मितीचा प्रयोग यशस्वी ठरत आहे. यात स्क्रॅपमधील विविध पार्टचा देखील वापर करण्यात आला आहे. आंतर मशागत आणि तण नियंत्रणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या यंत्राचा फायदा उत्पादनात वाढ होण्यासाठी होत आहे. शेतीमधील कामासाठी मजूर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळं शेतातील कामे वेळेवर पार पाडली जात नसल्यानं शेतकऱ्यांना नुकसान देखील सोसावं लागत आहे. 




आंतर मशागतीला उपयुक्त ठरतायेत यंत्र


शेतकरी योगेश लीचडे यांच्याकडील तीन एकर शेतीवर वारंवार ट्रॅक्टर सारख्या मोठ्या यंत्राचा वापर करणे शक्य नव्हते. याशिवाय कमी शेती असल्यानं लवकर ट्रॅक्टर किरायानं देखील उपलब्ध होत नव्हता. मजूर देखील वेळेवर उपलब्ध होत नसल्यानं वेल्डिंग प्रशिक्षण पूर्ण केलेल्या या युवा शेतकऱ्याच्या कल्पकतेतून आंतर मशागतीसाठी छोट्या यंत्रांची निर्मिती झाली. सुरुवातीला आपल्याच शेतीसाठी या शेतकऱ्याने पायी चालत वापरला जाणारा छोटा पावर विडर तयार केला. त्यात सुधारणा करीत आंतर मशागतीला उपयुक्त ठरेल असे यंत्र बनवले. त्याचा आपल्या शेतात वापर देखील केला. त्याचा फायदा झाला आणि उत्पादन खर्चही वाचतोय. उत्पादनातही भर पडली. हेच हेरुन या शेतकऱ्याने या पावर विडरमध्ये मॉडीफिकेशन केले. त्याचा आकार आणि क्षमता वाढवली. तीन प्रकारची यंत्र त्याने विकसित केली आहेत.




मिनी ट्रॅक्टरही केला तयार 


आपल्या या कार्यात योगेश यांना घरच्यांची देखील साथ मिळाली आहे. त्यांनी मिनी ट्रॅक्टर देखील तयार केला आहे. पाच हॉर्स पावर इतक्या क्षमतेचे इंजिन यात वापरण्यात आले आहे. हा मिनी ट्रॅक्टर तीन लिटर डिझेलमध्ये सहा तास काम करु शकतो. त्याला कल्टीवेटर आणि वखर पास जोडून कामे केली जाऊ शकतात. ट्रॅक्टरमध्ये इंजिन आणि गिअर विभाग स्वतंत्र ठेवण्यात आले आहे. परिसरात अनेक शेतकऱ्यांनी या यंत्राचा फायदा घेतला आहे.


 मिनी ट्रॅक्टर करण्यासाठी 75 हजार रुपयांचा खर्च 


शेतकऱ्यांचा पैसा, वेळ आणि मजुरीचा खर्च या यंत्राच्या माध्यमातून वाचत आहे. बैलजोडीने चार एकर शेतीची आंतरमशागत केली तर दोन दिवस लागतात. एकरी एक हजार याप्रमाणे चार हजार रुपयांचा खर्च येतो. तर हेच काम मिनी ट्रॅक्टरने केले तर एकराला 100 रुपयांचे डीझेल याप्रमाणे चार एकराला 400 रुपयांचे डिझेल लागते. एका मजुराची 600 रुपये मजुरी असे एक हजार रुपयात एकाच दिवसात चार एकर शेतीची मशागत शक्य होते. यात शेतकऱ्यांना तीन हजार रुपयांची बचत होते आहे. शेतकऱ्यांचा वेळही वाचत आहे. याशिवाय ट्रॅक्टर भाड्याने घेतला तर हीच कामे करण्यासाठी वेळेवर ट्रॅक्टर उपलब्ध होत नाही. भाड्याची रक्कम देखील जास्त असते. मिनी ट्रॅक्टर तयार करायला योगेश लीचडे या शेतकऱ्याला 75 हजार रुपयांचा खर्च आला आहे. तर पावर विडर तयार करायला या शेतकऱ्याला 50 हजार रुपयांचा खर्च आला आहे. शेतकऱ्याची गरज आणि कल्पकता याची सांगड घालून शेतकरी स्वतःच आपल्या उत्पादनात भर पाडत आहे. अशा शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या प्रोत्साहनाची गरज आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


'रुरल जुगाड स्पर्धेत' मराठवाड्याच्या पोरानं मारली बाजी; अक्षय देशातून पहिला, शेतमाल वाहतुकीसाठी भन्नाट जुगाड