Virat Kohli On IPL Retirement: आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सचा (Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings) 6 धावांनी पराभव करून आपले पहिले आयपीएल विजेतेपद मिळवले. या हंगामात विराट कोहलीने (Virat Kohli) 614 धावा करत 8 अर्धशतके झळकावली. आयपीएलच्या अंतिम सामन्यानंतर विराट कोहली आयपीएलमधूनही निवृत्ती (Virat Kohli On IPL Retirement) घेईल, अशी चर्चा रंगली होती. त्यामुळे सगळ्या भारतीयाचं याकडे लक्ष लागलं होतं. 

विराट कोहलीने आयपीएलमधून निवृत्तीची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. 2025 च्या आयपीएल हंगामात, कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाचे नेतृत्व करताना त्यांच्या पहिल्या आयपीएल विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावली. या विजयामुळे कोहली अत्यंत भावूक झाला आणि त्याने आपल्या 17 वर्षांच्या स्वप्नपूर्तीसाठी आनंद व्यक्त केला.

विराट कोहली आयपीएलमधूनही निवृत्ती घेणार?

आयपीएलचं जेतेपद जिंकल्यानंतर विराट कोहली म्हणाला की, गेल्या 18 वर्षांत मी या संघाला सर्वकाही दिलं आहे. काहीही झालं, तरी मी संघाशी एकनिष्ठ राहिलो. अनेकदा असे क्षण आले, जेव्हा माझ्या मनात वेगळे विचार येत होते पण मी या संघाशी एकनिष्ठ राहिलो. मी त्यांच्या मागे उभा राहिलो, ते देखील माझ्या मागे उभे राहिले. मी नेहमीच आरसीबीला आयपीएलची ट्रॉफी जिंकून देण्याचं स्वप्न पाहिले आहे. कारण बंगळुरू माझ्या मनात आहे. मी शेवटच्या दिवसांपर्यंत मी या संघासाठी खेळणार आहे, असं विराट कोहलीने स्पष्ट केले. विराट कोहलीच्या या वक्तव्यावरुन हे तर स्पष्ट झालं आहे की, विराट कोहली इतक्यात आयपीएलमधून निवृत्त होणार नाही. 

अंतिम सामना कसा राहिला?

पंजाब किग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला 190 धावा करता आल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून विराट कोहलीने सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्ज संघाकडून शशांक सिंगने नाबाद 61 धावांची खेळी केली. तर जोस इंग्लिशने 39 धावांची खेळी केली, पंजाब किंग्ज संघाला 184 धावा करता आल्या. हा संघ विजयापासून आणि आपल्या पहिल्या ट्रॉफीपासून 6 धावा दूर राहिला.

संबंधित बातमी:

RCB IPL Final 2025: 'Ee Sala Cup Namde' पासून 'Ee Sala Cup Namdu' पर्यंत आरसीबीचा प्रवास; पण याचा नेमका अर्थ काय?

RCB IPL 2025: Ee Sala Cup Namdu...जिंकले, हसले, रडले; आरसीबीचं जंगी सेलिब्रेशन; भावूक करणारे PHOTO