RCB vs PBKS IPL Final 2025 : आयपीएल 2025 चा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात झाला. हा सामना खूपच रोमांचक होता, ज्यामध्ये आरसीबीने पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव करून पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकली. या विजयासह, आरसीबीने 18 वर्षांची दीर्घ प्रतीक्षा संपवली आणि अखेर त्यांची पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकली. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाब किंग्जने 11 वर्षांनी अंतिम फेरी गाठली. पण आता पंजाब किंग्सला जेतेपदासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने मन मोकळं केलं आणि कोणावर पराजयाचे खापर फोडले आणि तसेच सामना कुठे गमावला हे सांगितले.

Continues below advertisement

Continues below advertisement

फायनलमधील पराभवानंतर श्रेयस अय्यर काय म्हणाला?

फायनलमधील पराभवानंतर श्रेयस अय्यर म्हणाला की, प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर निराशा झाली, परंतु आमच्या पोरांना ज्या पद्धतीने या संधीचा सामना करायला आली, ती तशी नव्हती पण त्याचे बरेच श्रेय सपोर्ट स्टाफ, मालक आणि यात सहभागी झालेल्या प्रत्येकाला जाते. शेवटच्या सामन्याचा विचार करता, मला वैयक्तिकरित्या असे वाटले की 200 धावा हा एक चांगला स्कोअर होता. त्यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली, विशेषतः कृणाल, त्याच्याकडे भरपूर अनुभव आहे. मला वाटते की हाच टर्निंग पॉइंट होता. पण या संघात सहभागी असलेल्या प्रत्येकाचा मला खूप अभिमान आहे.

पुढे तो म्हणाला की, मला खात्री आहे की पुढच्या वर्षी जेव्हा ते येतील तेव्हा ते त्यांच्यासोबत भरपूर अनुभव घेऊन येतील. आम्ही त्याभोवती काही रणनीती आणि डावपेच बनवू शकतो जेणेकरून आम्ही काही चांगले क्रिकेट खेळू शकू. विशेष म्हणजे अय्यर स्वतः केवळ 1 धाव काढून बाद झाला होता. पण त्याने या पराभवनंतर कोणत्या खेळाडूला जबाबदार धरले नाही.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, आरसीबीने प्रथम फलंदाजी केली आणि 20 षटकांत 190 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पंजाब संघानेही दमदार खेळ केला, परंतु त्यांना 20 षटकांत फक्त 184 धावाच करता आल्या. शेवटच्या षटकापर्यंत चाललेला हा सामना खूप मनोरंजक होता, परंतु आरसीबीच्या शानदार गोलंदाजीमुळे पंजाबला विजय मिळू शकला नाही. अंतिम सामन्यात आरसीबीचा खेळाडू कृणाल पंड्याला त्याच्या शानदार कामगिरीसाठी 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून निवडण्यात आले.

हे ही वाचा -

Virat Kohli Celebration : मैदानावर रडला… सावरला आणि जल्लोषात ट्रॉफी उचलली; विराट कोहली आणि RCBचे जोरदार सेलीब्रेशन, पाहा Photo