Katrina Kaif And Vicky Kaushal One Month Anniversary : बॉलिवूड बार्बीगर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कतरिना कैफने 9 डिसेंबर 2021 रोजी अभिनेता विकी कौशलबरोबर सात फेरे घेतले. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मिडीयावर बरेच व्हायरलदेखील झाले होते. या दोघांच्या लग्नाने चाहतेसुद्धा अगदी खूश झाले होते. आज 9 जानेवारीला विकी आणि कतरीनाच्या लग्नाला एक महिना झाला असून या खास दिवसाकरता मिसेस कौशलने इन्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत पती विकीला शुभेच्या दिल्या आहेत. या फोटोंमध्ये विकी आणि कतरिनाची (Vicky And Katrina Romantic Chemistry)रोमॅंटिक केमिस्ट्री दिसून येतेय. हा फोटोही सोशल मिडीयावर बराच व्हायरल होतोय. 

Continues below advertisement

एक महिना वाढदिवसानिमित्त इन्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत कतरिना विकीच्या मिठीत दिसून येतेय. एवढेच नाही, तर विकी कौशल सेल्फी काढताना दिसून येतोय. कतरिना ( Katrina kaif )आणि विकीच्या ( Vicky Kaushal ) या रोमॅंटिक प्रसंगाला बघून चाहत्यांकडूनही शुभेच्छांचा वर्षाव होतोय. या  फोटोकडे पाहून या दोघांमधलं प्रेम दिसून येतंय. आतापर्यंत कतरिनाच्या या पोस्टला ८ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. यावरूनच चाहत्यांना हा फोटो किती आवडला असेल याचा अंदाज लावता येतोय. 

विकी कौशल आणि कतरिना कैफचं लग्न (Vicky Kaushal And Katrina Kaif Wedding)त्यांच्या चाहत्यांसाठी एखाद्या सरप्राईझपेक्षा कमी नव्हतं. मिडीयाला मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे एकमेकांना फार आधीपासूनच डेट करत होते पण त्यांनी ऑफिशियली त्यांच्या नात्याची कबूली दिली नव्हती. इतकेच नव्हे तर त्यांचे लग्नही इतक्या खाजगी पद्धतीने झाले की कोणाला त्याचा अंदाजही लावता आला नाही. राजस्थानमधल्या सिक्स सेंस फोर्ट भरवाडा येथे या दोघांनी एकमेकांचा पती-पत्नी म्हणून स्विकार केला होता.

Continues below advertisement

विकी कौशल सध्या इंदोरमध्ये आपल्या आगामी चित्रपटाचं शूटिंग करतोय तर कतरिना कैफ 8 जानेवारीला एअरपोर्टवर दिसली होती. यावरूनच कतरिना आपल्या पतीबरोबर लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली होती असं म्हणता येईल. काही दिवसांपूर्वीच विकीसुद्धा आपल्या पत्नीसह नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी थेट इंदोरहून मुंबईत आला होता एकूणच या दोघांमधली रोमॅंटिक केमिस्ट्री चाहत्यांना आवडतेय. 

हे ही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

[yt][/yt]