Katrina Kaif Flaunt Mangalsutra: बॉलिवूड कपल कतरिना कैफ (Katrina Kaif)आणि विकी कौशल (vicky Kaushal)हे नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर अगदी तुफान वायरल झाले होते. विकी आणि कतरिना कैफ यांनी लग्नाच्या समारंभाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच ते व्हायरल झाले होते. आज कतरिनाने भारतीय वधूप्रमाणे आपले मंगळसूत्र फ्लॉन्ट करत फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे. 


कतरिनाने आपल्या नवीन घरात आनंद साजरा करताना फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये तिने डेनिम पॅन्टबरोबर जिप अप जंपर परिधान केलेले दिसून येत आहे. या फोटोचे वैशिष्ट्य असे की, यामध्ये तिचे मंगळसूत्र दिसून येत आहे. कतरिनाने फोटो शेअर करत घर आणि ग्रीन हार्ट इमोजी शेअर केला आहे. 


खास आहे कतरिनाचे मंगळसूत्र


कतरिना कैफचे हिऱ्यांनी बनलेले मंगळसूत्र डिझाईनर सब्यसाचीचे बंगाल टायगर कलेक्शन आहे. हे काळ्या आणि सोनेरी अशा मोत्यांनी बनलेले आहे ज्यामध्ये खाली दोन हिरे लावले आहेत. 


विकीला ड्रॉप करण्यासाठी आली होती एअरपोर्टवर


विकी कौशल या दिवसात त्याच्या आगामी चित्रपटासाठी इंदोर येथे शूटिंग करत आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. विकीने शूटिंगमधून सुट्टी घेत कतरिनाबरोबर नवीन वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी तो मुंबईत आला होता. ज्यानंतर कतरिना विकीला एअरपोर्टवर ड्रॉप करण्यासाठी गेली होती. कतरिना आणि विकीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. 


विकी कौशल आणि कतरिना कैफ 9 डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकले होते. दोघांनी राजस्थानच्या सिक्स सेंस फोर्ट भरवाडा येथे सात फेरे घेतले होते. विकी आणि कतरिनाच्या लग्नात परिवार आणि काही खास मित्रमंडळींचा समावेश होता. लग्नानंतर विकी आणि कतरिना हनिमूनसाठी मालदीवला गेले होते. या दोघांनी नुकताच आपल्या नवीन घरात प्रवेश केला आहे. घरात प्रवेश करण्याआधी दोघांनी विधिवत पूजादेखील केली होती.


हे ही वाचा -



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha