Mumbai Corona Update : विरोधकांकडून निर्बंध लावण्याबाबत होत असलेल्या आरोपावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज उत्तर दिलं आहे. महापौरांनी म्हटलं आहे की, विरोधकांनी कोरोनादूत बनू नये,  असं पेडणेकर म्हणाल्या.


महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, उद्यापासून कडक निर्बंध लावले जात आहे.  लोकांना हे कळलं पाहिजे हे काही हौसेनं लागलेलं नाही.  ओमायक्रॉन वाढतोय.  पंतप्रधान, मुख्यमंत्री चिंतेत आहेत, प्रत्येकांशी बोलतायत. संपूर्ण कोव्हिड काळात महाराष्ट्राची दखल घेतली गेलीय. मात्र मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की कोव्हिड दूत बनू नका.  लोकं आज बरेच बाहेर पडतात, मात्र बाहेर पडताना काळजी घ्यावी. लहान मुलं बाधित होतायत, त्यामुळे शाळा बंद, संसर्गात त्यांना बाहेर आणणे चुकीचं आहे. मास्क घालणं आणि इतर गोष्टींसाठी जनजागृती करणं महत्त्वाचं आहे, असं महापौरांनी म्हटलं आहे. 


महापौरांनी सांगितलं की,  लोकल आणि बसेस व्यवस्थित सुरु राहतील.  मजुरांच्या मनात जाणीवपूर्वक लॅाकडाऊन लागण्यासंदर्भात  भ्रम तयार केला जातोय.   मात्र अशा अफवांवर बिलकुल विश्वास ठेऊ नका. कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र लॅाकडाऊन नाही, असंही त्या म्हणाल्या.


ब्युटी पार्लर बंदच्या निर्णयावर त्या म्हणाल्या की,  महिलांना ब्युटी पार्लरसोबत अधिक जवळ संबंध येत असतो. अशात तज्ज्ञांना वाटलं असेल की एवढा जवळचा संपर्क येऊ नये.  कटिंग करताना मागच्या बाजूने आपण कटिंग करतो आणि व्यक्ती दूर असतो. त्यामुळे ब्युटी पार्लरसाठी निर्बंध कडक करण्यात आले आहेत, असं त्या म्हणाल्या.  



इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha