मुंबई:  "मुंबईमध्ये शेतकरी असल्याचे सांगितले जात आहे. मला याबाबत काहीही माहीत नाही. पण एकदा सरकारने खातरजमा करायला हवी असा चिमटा काढत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आम्ही अधांतरी सोडणार नाही", असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला.


शिवसेनेच्या 'शिवालय' या कार्यालयाचं उद्घाटन आज उद्धव यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई मेट्रोचे काम सुरू असल्याने शिवसेनेचे पक्ष कार्यालयात मंत्रालयाजवळा स्थलांतरित करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना उद्धव म्हणाले, "मुख्यमंत्री जर म्हणत आहेत की, कर्जमाफीने 89 लाख शेतकऱ्यांना लाभ होईल तर त्यांची यादी आणि 40 लाख सातबारा कोरा झालेल्या शेतकऱ्यांची यादी आम्ही विधानसभेत मागणार आहोत. त्यावेळीच कर्जमाफीचा पारदर्शीपणा स्पष्ट होईल".

याशिवाय मराठवाड्यासह राज्यात पुन्हा 9 जुलैपासून मी दौरा करणार असून शेतकऱ्यांशी पुन्हा संवाद साधणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

मुंबईतल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी!

मुंबईतील 813 शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचा उल्लेख मुख्यमंत्री कार्यलयाने प्रकाशित केलेल्या आकडेवारीत आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंबई शहर जिल्ह्यात 694 शेतकऱ्यांना, तर मुंबई उपनगर जिल्ह्यात 119 शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे कर्जमाफी मिळालेल्यांमध्ये मुंबई उपनगरापेक्षा मुंबई शहरातील शेतकरी जास्त आहेत. मुंबई शहरात नक्की कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

संबंधित बातम्या

मुंबईतील 813 शेतकऱ्यांसह राज्यातील कर्जमाफी...