Zomato Girl Video: झोमॅटो (Zomato) किंवा स्विगीवरुन (Swiggy) तुम्ही कधी जेवण मागवलं तर ऑर्डर देण्यासाठी डिलिव्हरी बॉय (Delivery Boy) आल्याचं तुम्ही पाहिलं असेल. पण कधी डिलिव्हरी गर्ल (Delivery Girl) तुमची ऑर्डर घेऊन आल्याचं तुम्ही कधी पाहिली का? सध्या अशाच एका झोमॅटो डिलिव्हरी गर्लचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंदूरच्या रस्त्यांवर लोकांना ही सुंदर झोमॅटो गर्ल पाहायला मिळाली. तिचा लूक आणि तिच्या बाईकवरील संपूर्ण अवतारामुळे सध्या ती व्हायरल होत आहे.


झोमॅटोचं टी-शर्ट आणि शॉर्ट्स घातलेली वेस्टर्न लूकमधली मुलगी पाहून रस्त्यावरील सर्वच जण चक्रावले. झोमॅटोची बॅग पाठीला लावून फॅन्सी बाईकवर स्टायलिश मुलगी पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. ट्रॅफिक सिग्नलवर लोकांनी जेव्हा तिला पाहिलं तेव्हा ते तिचं कौतुक करू लागले. पण या कृत्याला अनेकांनी झोमॅटोची प्रमोशनल अ‍ॅक्टिव्हीटी म्हटलं. ही तरुणी मॉडेल असल्याचं काहींनी म्हटलं. यानंतर आता स्वत: झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल (Deepinder Goyal) यांनी व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर प्रत्युत्तर दिलं आहे.






झोमॅटोच्या सीईओंनी केला खुलासा


फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोचे (Zomato) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) दीपिंदर गोयल (Deepinder Goyal) यांनी हा व्हिडीओ पाहिला आणि ट्विटरवरुन याचा खुलासा केला, ज्याने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.


दीपिंदर गोयल म्हणाले, कंपनीचा या मॉडेलशी काहीही संबंध नाही. त्यांच्या कंपनीचा इंदूरमध्ये मार्केटिंग हेडही नाही. याशिवाय झोमॅटो हेल्मेटशिवाय बाईक चालवण्यास प्रोत्साहन देत नाही. कोणीतरी आमच्या ब्रँडच्या नावाने फ्री राईड देत आहे असं वाटतं. एखादी महिला हे काम करत असेल तर त्यात काहीही चुकीचं नाही. आमच्या टीममध्ये शेकडो महिला आहेत, ज्या दररोज अन्न वितरीत करतात आणि त्यांचा आम्हाला अभिमान आहे.
 
झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपिंदर गोयल यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून या व्हिडीओचा खुलासा केला. झोमॅटोच्या सीईओंचं ट्विट पाहून अनेक जण विविध प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत.


हेही वाचा:


VIDEO: मुलाने चोरलं वेफर्सचं पॅकेट; पोलिसांनी चक्क मुलाला पकडून नेलं, व्हिडीओ तुफान व्हायरल