World Record: एका भारतीय व्यक्तीने असा काही पराक्रम केला आहे, ज्याची दखल जगाने घेतली आणि जगभरात आता त्याचं कौतुक होत आहे. मार्शल आर्ट शिकलेल्या एका व्यक्तीने नानचाकूचा वापर करुन एका मिनिटात 68 नारळ (Coconut) फोडले आहेत, जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. आता या व्यक्तीने नारळ फोडले तर खरं, पण ते काही लोकांच्या डोक्यावर ठेवून फोडले, जे पाहायलाही फार भयानक वाटतं. हा पराक्रम करुन त्यांनी जागतिक विक्रम (World Record) रचला आहे. या अनोख्या कामगिरीबद्दल या व्यक्तीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली आहे.


नेमका कसला रेकॉर्ड बनवला?


मार्शल आर्टिस्ट व्ही सैदलवी यांनी एका मिनिटात एक-एक करून 68 नारळ फोडले आहेत. सैदलवी हे कर्नाटकातील मद्दुर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. सैदलवी यांनी हे नारळ काही लोकांच्या डोक्यावर ठेवले होते, जे नानचाकूच्या मदतीने फोडायचे होते. सैदलवीने 68 नारळ फोडून स्वतःचाच विक्रम मोडला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सैदलवीने इटलीतील 'Lo Show Dei Record' या टॅलेंट शोमध्ये 42 नारळ फोडले होते. तर यावेळी त्याने 68 नारळ फोडून आपलाच विक्रम मागे टाकला आहे.


सैदलवीने फोडले सगळे नारळ


गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स (Guinness Book of World Records) यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात सैदलवी हे नारळ फोडताना दिसत आहेत. व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे, 6 जण काळ्या रंगाचा टी-शर्ट घालून खाली बसले आहेत, ज्यांच्या डोक्यावर नारळ ठेवण्यात आला आहे. या मुलांच्या मधोमध सैदलवी नानचाकू घेऊन उभे आहेत. एका कार्यक्रमात सैदलवी यांनी भाग घेतला होता. जेव्हा 'गो' म्हटलं जातं, तेव्हा सैदलवी एक-एक करुन सर्व नारळ नानचाकूच्या सहाय्याने फोडायला लागतात. प्रत्येक तरुणाच्या डोक्यावर ठेवलेला नारळ जेव्हा सैदलवी फोडतात तेव्हा तरुण लगेच दुसरा नारळ डोक्यावर ठेवतात




एका मिनिटात फोडले 68 नारळ


सैदलवी यांनी एका मिनिटात 68 नारळ फोडले. ज्यावेळी सैदलवी नारळ फोडत होते, त्यावेळी अनेक दर्शक तिथे उपस्थित होते आणि सर्वजण आश्चर्याने हा पराक्रम पाहत होते. सैदलवी हे मूळचे कर्नाटकचे राहणारे आहेत. त्यांनी हा रेकॉर्ड करताना कुणालाही इजा पोहोचणार नाही याची काळजी घेतली. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून त्यांनी या भारतीय व्यक्तीच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे.


हेही वाचा:


North Korea: माणूस म्हणावं की अजून काय? किम जोंगने आपल्या जनरलला संपवलं; नरकातही होत नाही इतका छळ