Zero Born Country: काही दिवसांपूर्वीच भारताने (India) सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून जगात आपलं नाव कोरलं आहे. आजच्या काळात जगातील सर्वात जास्त लोकसंख्या (Population) ही भारत देशात आहे. आता हे सगळं असताना दुसरीकडे जगात एक असाही देश आहे ज्याची लोकसंख्या कमी तर आहेच, पण तिथे मूल जन्मालाही येत नाही. हे जाणून आश्चर्य वाटलं असेल ना? तर जगातल्या अशाच देशाबद्दल अधिक जाणून घेऊया.


'या' देशात कोणातंही बाळ जन्माला येऊ शकत नाही


व्हॅटिकन सिटी (Vatican City) हा जगातील सर्वात लहान देश आहे. हे रोमन कॅथलिक चर्चच्या नेत्याचं अधिकृत घर देखील आहे. जरी हा देश सर्वात लहान असला तरी हा देश जगातील सर्वात प्रेक्षणीय ठिकाणांपैकी एक आहे. 17 व्या शतकातील सेंट पीटर स्क्वेअर आणि जगातील सर्वात प्रसिद्ध कलाकृती असलेलं संग्रहालय व्हॅटिकन सिटीत आहे. पण मनोरंजक गोष्ट ही आहे की, कोणीही व्हॅटिकन सिटीला त्याचं जन्मस्थळ म्हणू शकत नाही. कोणाही स्वत:ला या देशाचा रहिवासी देखील म्हणवू शकत नाही आणि यामागे एक अद्भभूत कारण आहे.


त्याचं आहे असं की, व्हॅटिकन सिटीमध्ये कोणीही जन्म घेत नाही, कारण तिथे बाळंतपणासाठी रुग्णालयं किंवा कोणतीही सुविधा नाही. व्हॅटिकन सिटीमध्ये राहणारे सर्व नागरिक हे मूळचे इतर देशांतील आहेत आणि त्यांच्यापैकी बहुतेक पुरुष ब्रह्मचारी आहेत. धर्मामुळे त्यांना लग्न करण्याची किंवा मुलं जन्माला घालण्याची परवानगी देखील नाही.


देशाला मिळाला सर्वात लहान देशाचा किताब


व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश मानला जातो, ज्याचं एकूण क्षेत्रफळ फक्त 49 हेक्टर आहे आणि तेथील लोकसंख्या 1,000 पेक्षाही कमी आहे. जगातील सर्वात लहान देशात व्हॅटिकन सिटीयानंतर मोनॅको, नाउरू आणि तुवालु या देशांचा क्रमांक लागतो.


दुसरीकडे, जर क्षेत्रफळानुसार बोलायचं झालं तर वर्ल्ड मीटरनुसार, जगातील सर्वात मोठा देश रशिया आहे. रशियाचं एकूण क्षेत्रफळ 6.6 दशलक्ष चौरस मैल किंवा 17 दशलक्ष चौरस किलोमीटरपेक्षा जास्त आहे. रशिया हा युरोप आणि आशियामध्ये स्थित एक आंतरखंडीय देश आहे. तर लोकसंख्येच्या बाबतीत बोलायचं झालं तर, भारत हा सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Health Tips: क्या आपके टूथपेस्ट में नमक है? खरंच मीठ असलेल्या टूथपेस्ट चांगल्या असतात का? जाणून घ्या