Viral Video : काही लोक इतके खवय्ये असतात, की विविध पदार्थ खाण्यासाठी ते लांबचा प्रवास करायला देखील तयार असतात. मात्र, जेव्हा त्यांच्या आवडत्या फूड रेस्टॉरंटमध्येच काहीसा विचित्र प्रकार घडतो, तेव्हा ते फार अस्वस्थ होतात. आता असेच एक प्रकरण चीनमधून (China) समोर आले आहे. जे पाहून तुम्हालाही धक्का बसेल. काय घडले नेमके? पाहुयात...


मशरूम नूडल्स सूप विकत घेतला, पण...


चीनमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सॅम हेवर्ड नावाच्या व्यक्तीने चायनीज रेस्टॉरंटमधून मशरूम नूडल सूप विकत घेतले. ते खात असताना त्याचे लक्ष सूपमध्ये तरंगणाऱ्या एका अशा वस्तूवर पडली, की बघताच क्षणी त्याला घाम फुटला. सुरुवातीला त्याला वाटले की, ही गोष्ट एक मोठी मशरूम आहे. मात्र, जेव्हा त्या व्यक्तीने ती वस्तू हलताना पाहिली तेव्हा त्याला धक्का बसला. त्याने सूप नीट पाहिल्यावर ती गोष्ट मशरूम नसल्याचे त्याला आढळले. कारण ती वस्तू चक्क नूडल्स सूपमध्ये उडी मारत होती आणि त्याला शेपूट देखील होती.


नूडल्स खातानाच किळसवाणा प्रकार


जेव्हा त्या व्यक्तीने नूडल सूप खाल्ले, तेव्हा त्याला त्यात चक्क एक जीवंत उंदीर दिसला. हे पाहून तो हैराण झाला आणि तेच मशरूम नूडल्स सूप आपण खाल्ल्याची किळस वाटू लागली, एका विश्वासू रेस्टॉरंटकडून हे कृत्य घडले यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. जीवंत उंदीर पाहून त्या माणसाची तब्येतही अचानक बिघडली. तसेच, त्याला अचानक आजारी असल्यासारखे वाटू लागले. या घटनेनंतर तो चक्क 25 मिनिटे वॉशरूममध्ये होता, कारण तेव्हा त्याला अस्वस्थ वाटू लागले.


सॅमने बनवला व्हिडीओ


सॅम हेवर्डने सांगितले की, त्याने जे काही खाल्ले, त्याची त्याला किळस येत होती. प्रत्येक वेळी तो मशरूम नूडल्स सूपमधील जीवंत उंदीरबद्दल विचार करत असे, तेव्हा त्याला आजारी वाटले. सूपमध्ये असलेला जीवंत उंदीर दाखवण्यासाठी हेवर्डने एक व्हिडीओही बनवला. त्यानंतर त्याने ताबडतोब त्या रेस्टॉरंटमध्ये तक्रार केली, जिथून त्याच्या मैत्रिणीने सूप मागवले होते. मात्र, रेस्टॉरंटने हे सूप आपल्या रेस्टॉरंटमधून खरेदी केल्याचे नाकारण्यात आले. कारण मैत्रिणीने रोख पैसे दिले होते, त्याची कोणतीही पावती तिच्याकडे नव्हती. पावती न मिळाल्यामुळे सॅम संबंधित रेस्टॉरंटची चूक सिद्ध करू शकला नाही. गेल्या 20 वर्षांपासून या रेस्टॉरंटमधून अन्न खात असल्याचेही हेवर्डने सांगितले.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Facts: येत्या काही वर्षांत एक अब्ज लोकांचा होणार मृत्यू; यामागे आहे 'हे' आश्चर्यकारक कारण