IND vs PAK: भारत आणि पाकिस्तानच्या (IND vs PAK) क्रिकेटपटूंच्या पगारात बरीच तफावत आहे. पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना अ, ब आणि क अशा तीन श्रेणींमध्ये वेतन दिलं जातं. एकीकडे जिथे बीसीसीआय (BCCI) भारतीय खेळाडूंना क्रिकेट खेळण्यासाठी करोडो रुपये देते, तेच तिथे पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड (PCB) पाकिस्तानी खेळाडूंना खूप कमी पैसे देते. विश्वचषकाचा (World Cup 2023) सामना खेळण्यासाठी येणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंना किती पैसे मिळतात? हे जाणून घेऊया.


A श्रेणीतील खेळाडूंना किती पगार मिळतो?


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा क्रिकेट जगतातील सर्वात मोठा सामना मानला जातो. विश्वचषक 2023 च्या निमित्ताने पुन्हा एकदा हे दोन संघ आमनेसामने आले आहेत. यामुळे पाकिस्तान संघाविषयी विविध माहिती जाणून घेण्यासाठी लोक आतुर आहेत. 


काही दिवसांपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) आपल्या पुरुष क्रिकेटपटूंसोबत नवीन करार करण्यास सहमती दर्शवली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात पगारवाढ आणि बोर्डाच्या कमाईतील महसुलाचा निश्चित हिस्सा समाविष्ट आहे. नवीन करारानुसार, 25 केंद्रीय खेळाडूंची तीन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. श्रेणी A मधील खेळाडू दर महिन्याला 45 लाख PKR ($15,900 किंवा अंदाजे 13.14 लाख रुपये) कमवतात.


पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हा ए कॅटेगरीमध्ये आहे. बाबरला 45 लाख PKR इतका वार्षिक पगार दिला जातो. भारतीय रुपयात ही किंमत 15 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. पाकिस्तानी संघातील विकेटकीपर फलंदाज मोहम्मद रिझवानही ए कॅटेगरीमध्ये आहे. रिझवानचा पगारही 45 लाख PKR आहे.


पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि विकेटकीपर मोहम्मद रिझवान याच्याशिवाय शाहीन शाह आफ्रिदीही ए कॅटेगरीमध्ये आहे. त्यालाही 45 लाख PKR मिळतात. त्याशिवाय पाकिस्तानच्या क्रिकेटरला वनडे सामन्यासाठी प्रति मॅच 4,68,815 पाकिस्तानी रुपये दिले जातात. तर टी-20 साठी 3,72,075 रुपये दिले जातात.


इतर श्रेणीतील खेळाडूंना किती पगार?


श्रेणी B खेळाडूंना 30 लाख PKR ($10,600 किंवा अंदाजे 8.76 लाख रुपये) मिळतात. C आणि D श्रेणींमध्ये येणाऱ्यांना दरमहा 7 ते 15 लाख PKR ($2,650-5,300 किंवा अंदाजे रु. 2.19-4.38 लाख) मिळतात. याशिवाय पीसीबीने सर्व फॉरमॅटमधील मॅच फीमध्येही वाढ केली आहे.


कसोटीत 50 टक्के, एकदिवसीय सामन्यात 25 टक्के आणि टी-20 मध्ये 12.5 टक्के वाढ झाली आहे. वाढीनंतर, ही रक्कम कसोटीसाठी PKR 12.50 लाख ($4,358 अंदाजे), ODI साठी PKR 6,44,620 ($2,247.70) आणि T20I साठी PKR 4,18,584 ($1459) मिळणार आहेत.


हेही वाचा:


IND vs PAK: ...म्हणून मोदी स्टेडियमवर पाकिस्तानी चाहत्यांची संख्या कमी, टीम इंडियाचे सपोर्टर्स अधिक