India Pakistan Match: भारत (India) आणि पाकिस्तानमध्ये (Pakistan) महामुकाबला रंगत आहे. या दरम्यान संपूर्ण नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) निळ्या रंगात न्हाऊन निघालं आहे. टीम इंडियाचे चाहते निळ्या रंगाची जर्सी घालून भारतीय संघाला पाठिंबा दर्शवत आहेत, खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवत आहे. या दरम्यान, स्टेडियममध्ये पाकिस्तानकडील लोक का बरं दिसत नाहीत? त्यांची संख्या इतकी कमी का? हा विचार तुमच्या डोक्यात आला का? तर यामागील कारण जाणून घेऊया. 


भारताकडून ठराविक पाकिस्तानी लोकांनाच व्हिसा


भारत-पाकिस्तान मॅचची (IND vs PAK) क्रेझ भारतासह पाकिस्तानी नागरिकांमध्ये देखील आहे. हेच कारण आहे की, मॅच पाहण्यासाठी पाकिस्तानातील बरेच लोक भारतात येऊ इच्छितात. असं असलं तरी, भारताकडून पाकिस्तानातील प्रत्येकाला व्हिसा दिला जात नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील काही खास व्यक्तींनाच भारत व्हिसा देत आहे. आता नेमके ते कोण लोक आहेत, ज्यांना भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी सरकारकडून व्हिसा दिला जात आहे ते पाहूया.


किती लोक पाकिस्तानातून भारतात आले?


भारत-पाकिस्तान विश्वचषक सामना पाहण्यासाठी पाकिस्तानातून भारतात येणाऱ्यांची यादी फार मोठी नाही. याचं कारण म्हणजे, भारत सरकार पाकिस्तानच्या प्रत्येक नागरिकाला व्हिसा देत नाही. भारताकडून फक्त पाकिस्तानी पत्रकार आणि काही खास चाहत्यांनाच व्हिसा दिला जात आहे. 


पाकिस्तानची न्यूज वेबसाईट ट्रिब्युनच्या एका रिपोर्टनुसार, पाकिस्तान उच्चायोग आणि क्रिकेट बोर्डने जवळपास 200 पत्रकार आणि बऱ्याच क्रिकेट चाहत्यांना व्हिसा देण्याची मागणी भारत सरकारकडे केली होती, पण तरीही सगळ्यांनाच व्हिसा दिला गेला नाही. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या फक्त 45 पत्रकारांनाच या सामन्यासाठी मान्यता पत्र (accreditation letter) मिळालं आहे.


किती लोक मॅच पाहण्यासाठी भारतात आले?


भारत-पाकिस्तानची मॅच पाहण्यासाठी पाकिस्तानातील पत्रकार आणि काही खास व्यक्तींनाच व्हिसा दिला गेला आहे. असं असलं तरी, पाकिस्तानातील हजारो लोक सामना पाहण्यासाठी भारतात येऊ इच्छित होते. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये 1 लाखांहून अधिक लोक सामना पाहण्यासाठी दाखल झाले आहेत. मोदी स्टेडियममध्ये 1 लाख 32 हजार सीट्स आहेत, तर यावरुन अंदाज लावला जाऊ शकतो की, भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये किती लोक आले असावे.


हेही वाचा:


IND vs PAK: जीतेगा भाई जीतेगा... भर रस्त्यात पाकिस्तानी चाचांचा नारा; पण भारतीय चाहत्यांच्या चातुर्यापुढे चाचाही हरले, पाहा मजेशीर व्हिडीओ