Trending Kabaddi Video : तुम्ही आजपर्यंत वेगवेगळ्या खेळाडूंचे भन्नाट व्हिडीओ (Viral Video) पाहिले असतील. धोनीचा हेलिकॉप्टर शॉट, विराटचा विक्रम असो किंवा मग फुटबॉलपटूंचे थरारक गोल असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. हे खेळाडू संपूर्ण तयारीनिशी त्यांच्या जर्सीमध्ये किंवा स्पोर्टस आऊटफिटमध्ये दिसतात. पण असे खेळ पारंपारिक पोशाखात खेळले तर... असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. मॅटवरील कबड्डी तुम्ही पाहिली असेल, पण मातीत साडी नेसून महिलांना कबड्डी खेळताना तुम्ही पाहिलं नसेल. मात्र आम्ही आज तुमच्यासाठी असाच एक खास व्हिडीओ घेऊन आलो आहोत.
सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल काही सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर साडी नेसलेल्या महिलांचा कबड्डी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये साडी नेसलेल्या महिलांना कबड्डी खेळताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही साडी नेसून कबड्डी खेळताना दिसत आहेत. इतकंच नाही तर आजूबाजूला उपस्थित नागरिक या महिलांना उत्साहाने प्रोत्साहन देताना दिसत आहेत.
येथे पाहा व्हायरल व्हिडीओ
साडी नेसून महिला कबड्डी खेळाताना पाहणं फारच खूप मनोरंजक आहे. हा व्हिडीओ छत्तीसगडमधील आहे. आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. छत्तीसगड ऑलिम्पिक स्पर्धेतील हा व्हायरल व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये साडी नेसलेल्या महिला कबड्डी खेळत आहेत. या सामन्यात एक पंचही दिसत आहे आणि इतर गावकरी महिलांचा खेळ पाहून त्यांना प्रोत्साहन देत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलं आहे. हा व्हायरल व्हिडीओ आतापर्यंत दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
भारतीय संस्कृतीचं दर्शन
या व्हिडीओमध्ये भारतीय संस्कृतीचं दर्शन होत असल्याने नेटकरी खूपच प्रभावित झाले आहेत. भारत हा संस्कृतीप्रधान देश आहे. विविधतेने नटलेल्या भारताचं जगभरात आकर्षण आहे. भारतातील संस्कृतीचं जगभरात विशेष आकर्षण आहे. यानेच प्रभावित होऊन जगभरातील पर्यटकही भारतात येत असतात. दरम्यान, मातीतील खेळातही भारतीय संस्कृतीचं सौंदर्य लाभल्याची प्रतिक्रिया काही नेटकरी व्यक्त करत आहेत.