Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायला मिळतात. कोणताही व्हिडीओ किंवा फोटो सोशल मीडियावर अवघ्या काही सेंकदात व्हायरल होतो आणि नेटकरी त्यावर आपल्या प्रतिक्रिया देताना पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ चर्चेचा विषय बनला आहे. हा व्हिडीओ एका अपघाताचा. व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला तिच्या दुचाकीच्या झालेल्या अपघातासाठी बाईक स्वार तरुणाला दोषी ठरवताना दिसत आहे. मात्र बाईक स्वार तरुणाच्या हेल्मेटवरील कॅमेऱ्यानं खरं सत्य समोर आणलं.


एक महिला आणि एक पुरुष दुचाकीवरून प्रवास करत होते. यावेळी त्यांचा तोल जाऊन त्यांचा अपघात झाला. यावेळी एक तरुण त्यांच्या मागेच त्याच्या दुचाकीने प्रवास करत होता. समोरच्या दुचाकीचा अपघात झाल्यानं तरुणानं त्याची बाई थांबवली. मात्र यावेळी चक्क महिलेनं अपघाताचं खापर तरुणावर फोडलं. बरं पण या तरुणाच्या बाईकचा समोरच्या स्कुटीला स्पर्शही झाला नव्हता. तरीही स्कुटीवरील महिला तरुणाावर ओरडू लागली.


तुम्हीही पाहा व्हायरल व्हिडीओ






 


व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, पुरुष आणि महिला स्कुटीवरून जात असताना अचानक तोल जाऊन रस्त्यावर पडतात. यावेळी त्यांच्यामागे बाईकवर असलेला तरुण त्याची बाईक थांबवतो. यावेळी रस्त्यावर पडलेली महिला उठून तरुणावर ओरडून अपघाताला तरुणाला कारणीभूत ठरवते. यावेळी महिला म्हणते की, बाईक स्वार तरुणाच्या धक्का लागल्याने स्कुटीचा अपघात झाला. मात्र, ही सर्व तरुणाकडील कॅमेऱ्यात चित्रित झाल्याने हा तरुण पुरता बचावला. या व्हिडीओमुळे या अपघातामागचं सत्य समोर आलं.


दरम्यान, व्हायरल झालेला हा व्हिडीओ कुठला आणि केव्हाचा आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी यावर जोरदार लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट करत म्हटलं आहे की, 'वो तो कैमरा था नहीं तो दीदी तो अपना खेल खेल चुकी थी' याचा अर्थ असा की, कॅमेरा होता म्हणून तरुण बाचला नाही तर महिलेनं याला चांगलच फसवलं असतं.