Viral Video : माणूस असो वा प्राणी भीती सर्वांनाच वाटते. याचा प्रयत्य तुम्हाला कुत्र्यांचा हा व्हिडीओ पाहून येईल. यामध्ये एका बाहुलली पाहून कुत्रे चांगलेच घाबरल्याचं दिसून येत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये कुत्रे एका बाहुलीला पाहून चांगलेच दचकले आहेत. हा गंमतीशीर व्हिडीओ पाहून तुमच्याही चेहऱ्यांवर हसू येईल. 


तुम्ही अनेकदा हॉरर चित्रपटामध्ये झपाटलेली बाहुली पाहून कलाकारांना दचकताना पाहिलं असेल. मात्र या व्हिडीओ अशीच एक बाहुली पाहून कुत्रे पुरते घाबरले आहे. अगदी काही सेकंदाचा हा व्हिडीओतील घाबरलेले कुत्रे पाहून नेटकऱ्यांना गंमत वाटत आहे, शिवाय त्यांची कीवही येत आहे.







बाहुलीला पाहून घाबरले कुत्रे
सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक हाँटेड चित्रपटात दिसणाऱ्या बाहुलीप्रमाणे झपाटलेली दिसणारी बाहुली दिसत आहे. ही बाहुली रिमोट कंट्रोलवर चालते. या बाहुलीजवळ तीन कुत्रे उभे आहेत. अचानक कोणीतरी रिमोटवरून बाहुलीची लाइट आणि गाणं चालू करते, ज्यामुळे तिथे उभे असलेले हे तिन्ही कुत्रे चांगलेच घाबरतात आणि दचकून उड्या मारू लागतात. हे दृश्य पाहून तुम्हीही नक्की हसाल. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.


सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर Huskyloyal नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ युजर्सला प्रचंह आवडला आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी व्हिडीओ लाइक आणि शेअर केला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करून आपले मतही मांडलं आहे.


इतर बातम्या