Why Wells Are Round In Shape : प्राचीन काळापासून ते सध्या आधुनिक काळात मानवाच्या राहनीमानात खूप बदलं झालं आहेत. पहिलं ज्या कामासाठी मेहन करावी लागायची आता ही कामं तंत्रज्ञानामुळे सहज शक्य झाली आहेत. पण पुरातन काळ आणि आधुनिक काळ यामध्ये एक गोष्ट मात्र तशीच राहिली आहे. ती म्हणजे विहीरीचा (Well) आकार. तुम्ही पाहिलं असेल की, विहीरी या गोल आकाराच्या असतात. काही ठिकाणी चौकोनी आकाराच्या विहिरी क्वचित पाहायला मिळतात. पण बहुतेक विहिरींचा आकार हा गोल असतात. अगदी प्राचीन काळापासून हा आकार सारखाच असतो. पण या आकारामागे एक वैज्ञानिक कारण आहे.
पाणी चौकोनी, त्रिकोणी, षटकोनी किंवा कोणत्याही आकाराच्या विहिरीत राहू शकतं. पाणी कुठेही साठवून ठेवता येत कारण, त्याचा कोणताही आकार नसतो, ते ज्या ठिकाणी किंवा भांड्यात ठेवतात त्याचा आकार पाणी घेतं. पण बहुतेक विहीरींचा आकार हा गोल असतो. या आकारामागे वैज्ञानिक कारण आहे. या आकारामुळे विहीर दीर्घकाळ टिकतात म्हणजेच थोडक्यात विहीरींचं आयुष्य वाढतं. आता हे कसं, ते वाचा.
प्राचीन काळापासून पाणीपुरवठ्यासाठी विहिरींचा वापर केला जात आहे. जुन्या काळात ग्रामीण भागातील लोक विहीरीतून मिळणाऱ्या पाण्यावरच अवलंबून असायचे. आजही अनेक भाग आहेत, जिथे लोक विहिरीतील पाणी वापरतात. विकास झाल्यामुळे बहुतेक ठिकाणी विहिरींच्या जागी नळ, बोअर पाहायला मिळतात.
'यामुळे' विहीर जास्त काळ टिकतात
विहीर जास्त प्रमाणात गोलाकार आकाराच्या असतात. चौकोनी, षटकोनी किंवा त्रिकोणी विहिरींमध्येही पाणी राहू शकलं असतं, मग गोलाकारच का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर जाणून घ्या. विहिरीचं आयुष्य वाढवण्यासाठी त्यांचा आकार गोलाकार ठेवण्याचं निश्चित करण्यात आलं होतं. विहीर कोणत्याही आकाराची बनवली तर तिचं आयुष्य जास्त नसतं. ती अधिक काळ टिकत नाही.
'हे' आहे वैज्ञानिक कारण
विहिरीत पाणी असते, त्यामुळे विहिरीचे जितके कोपरे असतील त्या कोपऱ्यांवर पाण्याचा दाब जास्त पडतो. त्यामुळे विहीरीच्या कोपऱ्यांवर जास्त दबाव पडून लवकरच भेगा पडू लागतील आणि झिज होईल. तर गोलाकार विहिरींमध्ये ही समस्या उद्भवत नाही. यामध्ये गोलाकार आकारामुळे विहिरीच्या भिंतीवर पाण्याचा दाब सारखाच राहतो. अशा स्थितीत या विहिरी शतकानुशतके शाबूत राहतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Wine Theft : जोडप्यानं चोरल्या 14 कोटी रुपयांच्या 45 वाईन बॉटल्स, 14 कोर्स मिल ऑर्डर करत रचलं कुभांड