MP New Born Goat Resembling Human : मध्य प्रदेशातील ( Madhya Pradesh ) विदिशा जिल्ह्यातील सिरोज येथे एक वेगळं दिसणारं बकरीचं कोकरू जन्माला आलं आहे. विदिशा जिल्ह्यात एका बकरीने माणसासारखे दिसणार्‍या कोकराला जन्म दिला आहे. याआधी तुम्ही कधी अशी घटना ऐकली किंवा पाहिली आहे का नसेल तर ही बातमी नक्की वाचा. एखाद्या प्राण्याने मानवी चेहऱ्याप्रमाणे दिसणाऱ्या पिल्लाला जन्म दिला आहे. या घटनेनंतर हे दुर्मिळ बकरीचं कोकरू पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली आहे.


माणसासारखा चेहरा असणारं कोकरू


मध्य प्रदेशातील विदिशामध्ये येथे ही घटना समोर आली आहे. या कोकरुला पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. नवाब खान नावाच्या एका पशुपालकाच्या बकरीने या वेगळ्या दिसणाऱ्या पिल्लाला जन्म दिला आहे. हे कोकरुचा चेहरा एखाद्या म्हाताऱ्या माणसाच्या चेहऱ्याप्रमाणेच दिसत आहे, हे पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. पशुवैद्यकीय तज्ज्ञांचं मते, 'हेड डिस्पेप्सिया' या दुर्मिळ आजारामुळे या कोकरुचा असा जन्म झाला आहे. तसेच, अशी पूर्ण वाढ न झालेली पिल्लं जास्त काळ जगत नाहीत.






कोकरूला पाहण्यासाठी परिसरात लोकांची झुंबड


माणसाप्रमाणे चेहरा असणाऱ्या वेगळ्या बकरीच्या पिल्लाचा जन्म शुक्रवारी झाला आहे. या पिल्लाच्या जन्मानंतर डॉक्टरांनी सांगितले की, या बकरीच्या कोकरुची पूर्णपणे वाढ झाली नाही. अशा अविकसित पिल्लाचं आयुष्य कमी असतं. मिळालेल्या माहितीनुसार, या कोकरूला पाहण्यासाठी परिसरात लोकांची झुंबड उडाली आहे. लोकांनी म्हटलं आहे की, त्यांनी अशी घटना यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. डॉक्टरांनी सांगितलं आहे की, पूर्ण वाढ झाली नसल्याने या कोकराला तोंडाद्वारे अन्न खाता येत नाही. सध्या इंजेक्शन सिरिंजद्वारे याला दूध पाजावं लागत आहे.


बकरीच्या पिल्लाचा फोटो व्हायरल


सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट व्हायरल होण्यासाठी वेळ लागत नाही. मानवी चेहऱ्याप्रमाणे दिसणाऱ्या या बकरीच्या पिल्लाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी याचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट आणि शेअर केले आहेत. शिवाय आजूबाजूची गावं आणि जिल्ह्यातील लोकसुद्धा या बकरीच्या कोकरुला पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.